Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजार जप्त, ईडीला आणखी काय सापडलं? सस्पेन्स वाढला

त्यांनी सांगितलं होतं की गोरेगाव पत्राचाळ संबंधित कोणत्याही एक कागद ईडीच्या हाती लागला नाही. मात्र अनेक कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजार जप्त, ईडीला आणखी काय सापडलं? सस्पेन्स वाढला
राऊत रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होतेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 8:25 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढताना दिसत आहेत. सकाळपासून त्यांच्या घरावर ईडीचे धाडसत्र (ED Raid) सुरू आहे. त्यानंतर काही तासांपूर्वी ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. ईडी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कार्यालयात घेऊन गेली आहे. तिथे संजय राऊत (Sanjay Raut ED Enquiry) यांची चौकशी सुरू आहे. हे मला अटक करायला आलेले आहेत आणि मी अटक करून घेतोय अशी प्रतिक्रिया या आधी संजय राऊतांनी दिली आहे. त्यानंतर आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संजय राऊत यांच्या घरून ईडीला 11 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत आणि ते ईडीने जप्त केले आहेत अशी माहिती समोर आलेले आहे.सुनील राऊत जे संजय राऊत यांचे बंधू आहेत. त्यांनी सांगितलं होतं की गोरेगाव पत्राचाळ संबंधित कोणत्याही एक कागद ईडीच्या हाती लागला नाही. मात्र अनेक कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

रात्री उशीरा अटकेची शक्यता

त्याचसोबत 11 लाख पन्नास हजारांची रोख रक्कम सुद्धा ईडीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आज झालेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान ही जी रक्कम आहे ती सापडल्याचेही कळतंय. त्यामुळे संजय राऊत यांच्या वरती रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई ईडीकडून केली जाते का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. साडेनऊ तास ज्यावेळी चौकशी झाली, त्यानंतर सुद्धा त्यांना पुन्हा एकदा समन्स देऊन ईडीच्या कार्यालयामध्ये तुम्हाला यावच लागेल अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि त्यानुसार संजय राऊत सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये आहेत.

रक्कम अडचणी वाढवण्याची शक्यता

गेल्या काही तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आज या चौकशीनंतर त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक दाखवलं जाईल, असेही बोलले जात आहे.  मात्र एक मोठी माहिती आतापर्यंत समोर येते ती म्हणजे साडेनऊ तासांच्या शोध मोहिमेमध्ये 11 लाख 50 हजारांची रोकड आता राऊतांच्या अडचणी किती वाढवणार? हेही पाहणं तितकेच महत्वाचं आहे.

कोणते पैसे कुठे फिरवल्याचा आरोप?

या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी घोटाळ्याचे पैसे मिळाले होते त्यातून त्यांनी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून जी काही मालमत्ता खरेदी केलेले होती, असा आरोप करण्यात येत आहे.   त्या मालमत्तेमध्ये तर पालघर मधील काही जमीन होती, जी प्रवीण राऊत यांनी खरेदी केलेले होती. दादर मधला फ्लॅट आणि अलिबाग मधील काही जमीन जी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत त्यांच्या नावाने खरेदी करण्यात आलेली होती. ती सगळी मालमत्ता यापूर्वी जप्त केलेली आहे.

कोर्टात कोणते मुद्दे मांडणार?

मात्र आज अचानकपणे संजय राऊत यांच्या घरी धाड टाकण्यात आलीय सातच्या दरम्यान त्यांच्या घरी ईडी पोहोचलेली होती. अकरा लाख पन्नास हजारांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागलेली आहे, ती रक्कम कशासाठी होती किंवा वैयक्तिक कामासाठी किंवा घर कामासाठी त्यांनी ठेवलेली होती का? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून तसेच संजय राऊत हे चौकशी दरम्यान देतीलच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं जर रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई संजय राऊत यांच्यावरती करण्यात आली तर कोर्टात नेमके काय काय मुद्दे?  एकूण मांडले जातात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.