Sanjay Raut ED: संजय राऊतांची संपत्ती जप्त का झाली? 9 प्रश्न आणि त्याची 9 उत्तरं सोप्या शब्दांत

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या दादरमधील फ्लॅटवर ईडीनं कारवाई केली आहे. यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. या संपूर्ण कारवाईचं मूळ नेमकं काय आहे, ते जाणून घेऊयात...

Sanjay Raut ED: संजय राऊतांची संपत्ती जप्त का झाली? 9 प्रश्न आणि त्याची 9 उत्तरं सोप्या शब्दांत
नेमकं ते कारण काय, ज्यामुळे राऊतांच्या घरावर कारवाई झाली?Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 5:26 PM

मुंबई : संजय राऊतांच्या घरावर कारवाई (Sanjay Raut ED) झाली. ही कारवाई एकट्या संजय राऊतांच्याच घरावर (Sanjay Raut Dadar Flat) झाली का? तर नाही. राऊतांसोबत आणखी कुणाकुणाच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली? नेमकी किती कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली? ही कारवाई करण्यामागचं प्रमुख कारण काय आहे? संजय राऊत यांचा या संपूर्ण कारवाईशी (Action taken by ED on Raut) थेट काय संबंध आहे? या कारवाईमागची नेमकी बातमी काय आहे, त्याबाबतचे 9 प्रश्न आणि त्यांची 9 उत्तरं सोप्या शब्दांत समजून घेऊयात…

9 प्रश्न आणि 9 सोपी उत्तरं –

  1. किती मालमत्ता जप्त? एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर कारवाई
  2. कोणत्या कायद्यानुसार कारवाई? मनी लॉड्रिंग एक्ट (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा) 2002 च्या कायद्यानुसार कारवाई
  3. कशामुळे कारवाई? गोरेगावच्या पत्राचाळ प्रोजेक्टच्या पुर्नविकास प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी कारवाई
  4. कुणाचा प्रकल्प? गुरु आशिष कंन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा प्रकल्प
  5. कंपनी कुणाची? या कंपनीचे माजी संचालक आहे, प्रवीण राऊत
  6. कोणकोणत्या मालमत्तेवर टाच? प्रवीण राऊतांच्या पालघर, सफाळे, पडगा येथील मालमांतवर टात वर्षा राऊतांच्या दादारमधील घरावर टाच वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी एकत्रित खरेदी केलेल्या किहिम किनाऱ्यावरील प्लॉट्स
  7. वर्षा राऊत कोण आहेत? वर्षा राऊत शिवसेना खासदार संजय राऊतांची बायको आहे. भाजपवर सातत्यानं हल्लाबोल करणं आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधण्यासोबत संजय राऊतांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन सनसनाटी वक्तव्य केलेली आहेत. दुसरीकडे स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांची पत्नी आहेत. पाटकर कुटुंबीयांचे राऊत कुटुंबीयांसोबत घनिष्ट मैत्रीचे आणि कुटुंबासारखे संबंध आहेत.
  8. प्रकरण कधीच? म्हाडाच्या कार्यकारी इंजिनियरनं एक प्रकार केली होती. 13 मार्च 2018 साली करण्यात आलेल्या तक्रारीनुसार राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि इतरांविरोधीत आरोप करण्यात आले होते. एफआयआर नं. 22/2018 नुसार ईडीनं याप्रकरणी तपास आणि चौकशी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
  9. चौकशीतून काय समोर आलं? -पत्राचाळीचा पुर्नविकास करण्याच्या उद्देशानं आर्थिक गैरव्यवहार झाला -म्हाडा आणि गुरु आशिष कंन्स्ट्रक्शनद्वारे एक करार करण्यात आला. -करारानुसार विकासक गुरु आशिष कंन्स्ट्रक्शन 672 घरांचा पुर्ननिर्माण करणार होतं -पुर्नविकास झाल्यानंतर इतर जागा विकासक निर्माण करुन इतर जागेत बांधकाम करुन विक्री करणार होतं -मात्र विकासकानं 672 घरांचा पुर्नविकास करण्याऐवजी म्हाडाच्या डोळ्यात धूळ फेकली आणि 901.79 कोटी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला -पुर्नविकासाच्या जागेचा FSI 9 बिल्डरांना विकून 901.79 कोटी रुपये लाटण्यात आले -नंतर MEADOWS नावाचा आणखी एक प्रकल्प सुरु करुन 138 कोटी रुपये फ्लॅट खरेदीदारांकडून घेतले -बुकींग अमाऊंटच्या रुपात ही 138 कोटीची रक्कम गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं जमा केली -जवळपास 1039.79 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं तपासात समोर -प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये HDILकडून ट्रान्सफर -वर्षा राऊत यांच्या खात्यात 55 लाख रुपये ट्रान्सफर केले -प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्या खात्यातून हा व्यवहार

संबंधित बातम्या :

Sanjay Raut ED : अलिबाग, मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तर भाजपला संपत्ती दान करतो

मला उत्तरप्रदेशातल्या उन्नावमध्ये मला भीती वाटली, कारण तिथे योगी सरकार आहे – प्रणिती शिंदे

Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.