सीरियल किलर असतो, सीरियल रेपिस्ट असतो, हा सीरियल कंप्लेनंट, राऊतांनी सोमय्यांचं रॅकेट पुराव्यानिशी उघड केलं
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या यांनाच टार्गेट केलं. जुन-जुलै 2015मध्ये सोमय्यांनी एचडीआयएल आणि जीव्हेकेवर मुंबईची 63 एकर जमीन हडपण्याचा आरोप केला.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनाच टार्गेट केलं. जुन-जुलै 2015मध्ये सोमय्यांनी एचडीआयएल आणि जीव्हेकेवर मुंबईची 63 एकर जमीन हडपण्याचा आरोप केला. त्यांनी एमएमआरडीएमध्ये (mmrda) सातत्याने तक्रारी केल्या. त्यांची ती सवय आहे. ते सीरियल कंम्प्लेनर आहेत. सीरियल किलर असतो, सीरियल रेपिस्ट असतो तसा तो सीरियल कंम्पलेनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. ऑक्टोबर 2015मध्ये सोमय्याने एमएमआरडीएवर आरोप लावला की एचडीआयएलला एक कोटी स्क्वेअरफूट कमर्शियल जमीन गिफ्ट दिली. त्याची मार्केट व्हॅल्यू 5 हजार कोटी आहे. त्यामुळे घोटाळ्याची स्पेशल चौकशी झाली पाहिजे. दोन्ही कंपन्यांना ब्लॅकमेल केलं पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. एक वर्ष त्यांनी सातत्याने एमएमआरडीएकडे तक्रार केली. चौकशीची मागणी केली होती, असं राऊत यांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांनी त्यांच्या कोणत्याच पत्रकात कधीच पोलीस किंवा केंद्र सरकारकडे या प्रकरणाची त्यांनी तक्रार दिली नसल्याचं उघड झालं आहे. त्यावेळी ते खासदार होते. ते लोकसभेत मुद्दा उचलू शकत होते. पण त्यांनी लोकसभेतही हा मुद्दा उचलला नाही. उलट 2016मध्ये त्यांनी एमएमआरडीएला तक्रार करणं बंद केलं. 1 डिसेंबर 2016मध्ये सोमय्याचा मुलगा नील सोमय्याला निकॉन इन्फ्रामध्ये पार्टनर बनवलं गेलं. त्यानंतर तक्रारीही बंद झाल्या. 27 जुलै रोजी निकॉनने 5 हजार स्क्वेअर मीटरच्या जमिनीच्या विकासाचे हक्क मिळवले, असं राऊत म्हणाले.
बाप-बेटे जेलमध्ये जाणार
राकेश वाधवानला पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुनही जमीन घेतली. हे सगळं संशयास्पद आहे. वाधवानच्या एडीआयएलचा घेऊन इतके गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्यासोबत असे व्यवहार कसे काय करु शकते? असा सवाल करतानाच बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. किती कागद फडफडवा, असा दावाही राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut Press Conference LIVE : आज राऊतांचं टार्गेट काय? शिवसेना भवनावरून दुसरी पत्रकार परिषद