मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज (5 जून) 48 वा वाढदिवस. योगींच्या कार्यकाळात राम मंदिराचं निर्माण होवो, अशा पद्धतीने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. (Sanjay Raut Birthday wishes to Uttar Pradesh CM Yogi Adityanath)
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी नेहमीच त्यांचा आदर करत आलो आहे. अयोध्येच्या लढाईत योगीजींनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात राम मंदिराचं निर्माण होवो” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ @myogioffice
को जन्मदिवस की शुभकामनाएं। मैं हमेशा से उनका आदर करता आया हूँ। अयोध्या की लड़ाई में योगी जी ने हमेशा मार्गदर्शन किया है। उनके कार्यकाल में राम मंदिर का निर्माण हो यही शुभेच्छा! pic.twitter.com/KDPvP9tjH1— Sanjay Raut (@rautsanjay61) June 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योगींना फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्वीटमध्ये शुभेच्छा दिल्या. “योगींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश प्रत्येक क्षेत्रात नवीन मापदंड मोजत आहे. नागरिकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल घडले आहेत. ईश्वर त्यांना दीर्घ आणि सुदृढ आयुष्य देवो” असं मोदी म्हणतात. (Sanjay Raut Birthday wishes to Uttar Pradesh CM Yogi Adityanath)
Birthday greetings to UP’s dynamic and industrious CM, Shri @myogiadityanath Ji. Under his leadership the state is scaling new heights of progress across all sectors. There is a marked improvement in the lives of citizens. May Almighty bless him with a long and healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2020
उत्तराखंडच्या पौड़ी गढवाल या जिल्ह्यातील पंचूर नामक लहानशा खेड्यात आदित्यनाथ यांचा जन्म झाला. तिथून ते गोरखपूरला आले आणि त्यांचे आयुष्यच बदलले. आधी ते संन्यासी झाले, नंतर खासदार आणि आता मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा : यूपीच्या मजुरांचा शिवसेना-काँग्रेस सरकारकडून छळ, ठाकरेंना माणुसकी क्षमा करणार नाही : योगी
वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या आणि गोरखपूरमधून ते खासदारपदी निवडून आले. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावे लागले नाही. 12 व्या लोकसभेत योगी सर्वात युवा खासदार होते. 1999, 2004, 2009 आणि 2014 अशी सलग चार टर्म ते गोरखपूरमधून खासदार होते. (Sanjay Raut Birthday wishes to Uttar Pradesh CM Yogi Adityanath)