Sanjay Raut : संजय राऊतांना शिवडी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स, किरीट सोमय्यांचा दावा, प्रकरण काय?
अर्थात हा सोमय्यांचा दावा आहे. मात्र संजय राऊत यांच्यामागे आधीच ईडीच्या चौकशीचा फेरा लागला असताना आता कोर्ट कचेरीच्या वाऱ्याही सुरू होणार का? असा सवाल आता या ट्विटने उपस्थित झाला आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातलं राजकीय वैर तर संपूर्ण महाराष्टाने पाहिलंं आहे. हे राजकीय वैर (Political War) फक्त टीका टिपण्णीपुरतं मर्यादित राहिलं नाही. तर हे प्रकरण फार शिविगाळीपर्यंतही गेल्याचे गेल्या काही दिवसात आपण पाहिलं आहे. कधी किरीट सोमय्या हे संजय राऊत यांच्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात तर कधी संजय राऊत हे किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत असतात. या आरोपात पुढे काय झालं? कुणाचा घोटाळा बाहेर आला? हे मात्र आजपर्यंत अनुत्तरीतच आहे. मात्र पुन्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सनसनाटी ट्विट केलं आहे. जे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवू शकतं. संजय राऊत यांना उद्या मुंबईतील शिवडी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजवण्यात आल्याचे सोमय्या आपल्या ट्विटमधून म्हणाले आहेत. हे प्रकरण काय आहे हेही सोमय्या यांनी सांगितलं आहे. अर्थात हा सोमय्यांचा दावा आहे. मात्र संजय राऊत यांच्यामागे आधीच ईडीच्या चौकशीचा फेरा लागला असताना आता कोर्ट कचेरीच्या वाऱ्याही सुरू होणार का? असा सवाल आता या ट्विटने उपस्थित झाला आहे.
किरीट सोमय्यांचा दावा काय?
मेधा किरीट सोमैया बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना उद्या 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवरी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स जारी, आशा आशयाचे ट्विट हे सोमय्या यांनी केले आहे.
किरीट सोमय्या यांचं ट्विट
Summons issued to #SanjayRaut to attend Sewree Court tomorrow 4 July 11am in Medha Kirit Somaiya Defamation Case
मेधा किरीट सोमैया बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना उद्या 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवरी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स जारी @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 3, 2022
संजय राऊत यांच्या कोर्ट वाऱ्याही सुरू होणार?
दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची ईडीकडून दहा तास चौकशी करण्यात आलीय. त्यावेळी भाजप नेते सोमय्या यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांची डोकेदुखी आणखी वाढणार का? असाही सवाल विचारण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर अनेक राऊतांची भाषाही घसरली होती आणि किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर संजय राऊत हे तर नेहमीच असतात. आता हे प्रकरण कुठे जाणार? हे येणारा काळच सांगेल.