राज्यातल्या सरकारचा मृत्यू ठरलेला, कुठलाही अडथळा आणला नाही तर सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, राऊत यांचा दावा काय ?
महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
नवी दिल्ली : आम्ही सर्व प्रकारह्या लढाईला तयार आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आले आहे. जे सरकार भष्टाचार करत आहे, जे निर्णय घेत आहे ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. भविष्यात आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत, महाराष्ट्रातील या प्रकरणावरुन देशात आणि जगात काय मेसेज जाणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला सत्याच्या पलीकडे काहीही नको आहे. सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाफ वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात लढाई लढत आहोत, निवडणूक आयोगाकडे न्याय मागत आहोत, आणि यामध्ये आमच्याच बाजूने निकाल लागेल असे संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
महाशक्ती आमच्या पाठीमागे आहे असे सांगून ते सरकार चालवत असतील तर आमचा विश्वास न्याय शक्तीवर आहे असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
खरं म्हणजे हा निकाल पहिल्याच दिवशी लागू शकला असता. फेब्रुवारीपर्यन्त याबाबत निकाल लागायला पाहिजे, त्यानुसार हे घटनाबाह्य सरकार तेव्हा कोसळेल असा दावा राऊत यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील एक शहाणे मंत्री म्हणाले, मार्च पर्यन्त सरकार पाडून दाखवा, कानामधील बोळे काढून जरा नीट ऐका कान साफ करून माझं बोलणं ऐका असं सुधीर मुंगनटीवार यांना सुनावलं आहे.
अती शहाणे मंत्री म्हणत सुधीर मुंगणटीवर यांना टोला लावत कान साफ करून माझं वक्तव्य ऐका, नाहीतर कानकोरणे पाठवतो, जर न्यायालयीन प्रक्रिया झाली तर सरकार पडेल असे मी म्हणालो असे राऊत यांनी म्हंटलं आहे.
या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे, हे सरकार जीवंत नाही असा हल्लाबोल ही राऊत यांनी केला आहे.
जानेवारी पर्यन्त सगळी प्रक्रिया झाली तर सरकार फेब्रुवारीत पडेल असे सांगत स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगावर विश्वास असायला पाहिजे.
निवडणूक आयोगात आज सुनावणी आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी खात्री असल्याचेही राऊत यांनी म्हंटले आहे.