पुरते नागडे झाले, पुरावे कसले मागता, आता हिशोब द्या; संजय राऊत यांचा दादा भुसे यांच्यावर हल्ला

दादा भुसे बदनामी प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर होते. यावेळी त्यांनी दादा भुसे यांची माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला होता. या घोटाळ्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

पुरते नागडे झाले, पुरावे कसले मागता, आता हिशोब द्या; संजय राऊत यांचा दादा भुसे यांच्यावर हल्ला
sanjay rautImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 12:48 PM

चंदन पुजाधिकारी , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मालेगाव | 2 डिसेंबर 2023 : दादा भुसे यांना अजून काय पुरावे पाहिजे? पूर्ण नागडा झालाय. पुरावे म्हणजे काय? कसले पुरावे? आम्ही हिशोब मागतोय. आम्हाला कुठे पुरावे मागता? शेतकरी रस्त्यावर आहेत. त्यांच्याकडे पावत्या आहेत. कसले पुरावे मागता? असा सवाल करतानाच तुरुंगात जायची तयारी ठेवा, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांना दिला आहे. तसेच अद्वैय हिरे यांचं कुटुंब शिवसेनेसोबत आल्यापासून कारवाया सुरू झाल्या. मी कालच प्रशांतदादा हिरे यांना भेटलो. त्यांच्या कुटुंबाला भेटलो. संपूर्ण शिवसेना हिरे कुटुंबाच्या पाठी आहे. आम्ही त्यांच्या लढाईत दोन पावलं पुढे आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दादा भुसे बदनामी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहिले. यावेळी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलून संजय राऊत यांना दिलासा दिला. आपसात वाद मिटवण्याचा सल्लाही कोर्टाने राऊत यांना दिला. पण राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली. अद्वैय हिरे यांना तुरुंगात टाकण्यामागचं कारण राजकीय असल्याचा दावाही त्यांनी केला.

राजकीय सूडाची कारवाई

मालेगावचा एक योद्धा तुरुंगात आहे. अद्वैय हिरे. मी इथे आहे. पाच सहा महिन्यांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं होतं. अद्वैय हिरे तेव्हा होते. आता तुरुंगात आहेत. राजकीय सूडाची कारवाई यालाच म्हणतात. बँकेच्या एका कर्जप्रकरणात सरकारच्या दबावात त्यांना अटक झाली, असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही लढवय्ये

ईडी, ईडब्ल्यूओ सर्वांना मी पत्र लिहिलं आहे. गिरणा मौसम सहकारी कारखान्यासाठी दादा भुसे यांनी 178 कोटी रुपये जमा केले. त्याचा हिशोब द्या. शेकडो पावत्या आहेत. त्याकाळातील ही रक्कम आहे. आम्ही हा हिशोब मागतो तो गुन्हा आहे का? चोराला चोर म्हणण्याचा अधिकार घटनेने दिला. हे पैसे मनी लाँड्रिंग केले का? आम्ही का घाबरतो का? पळतो का? आम्ही घाबरत नाही. नोटीस आली की पळत नाही इतर पक्षात. आम्ही लढवय्ये आहोत. आम्ही लढणारच. आम्ही इथेच आहोत, असं राऊत यांनी ठणकावलं.

सर्वच दखल घेतील

ही ठिणगी पडली आहे. वणवा पेटेल. संजय राऊत यांनी कधीच कुणाची माफी मागितली नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सत्य हे सत्य असेल तर माफी कसली? पुरावा आहे. सरकार रस्त्यावर उतरला आहे. माफी कुणाची मागायची. दादा भुसे यांनी माफी मागावी. आम्ही जे जे पुरावे दिले त्या सर्वांची 2024ला सर्व दखल घेतली जाईल. ईडी, पोलीस, सीबीआय हे सर्व स्यूमोटो दखल घेतील. आम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरजही पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.