Sanjay Raut : जे पी नड्डा काय देशाचे गॉडफादर? धाडीची हकीकत सांगताना संजय राऊतांच्या भावाचा संतप्त सवाल

जे गेले ed ला  घाबरून गेले, त्यांना लवकरच पश्चाताप होईल . असे सूचक विधानही त्यांनी केलं आहे. तसेच ते काल कोश्यारी काय बोलले त्याचा कोणी निषेध केला का ? भाजपच्या ताटाखाली बसलेले मांजरं आहेत ती, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Sanjay Raut : जे पी नड्डा काय देशाचे गॉडफादर? धाडीची हकीकत सांगताना संजय राऊतांच्या भावाचा संतप्त सवाल
जे पी नड्डा काय देशाचे गॉडफादर? धाडीची हकीकत सांगताना संजय राऊतांच्या भावाचा संतप्त सवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 8:00 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात एकिकडे संजय राऊतांची (Sanjay Raut) अटक गाजतेय. तर दुसरीकडे प्रादेशिक पक्षांबाबतचं भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचं वक्तव्य गाजतंय. परिवार पक्ष संपत आले आहेत, या जे.पी नड्डा यांच्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी संतप्त सवाल केला आहे. तसेच त्यांनी धाडीची हकीकतही सांगितली आहे.  शिवसेना (Shivsena) संपेल असे सांगेल पक्ष संपणार असे विधान त्यांनी केलं आहे. तसेच हे सांगायला जे. पी. नड्डा काय देशाचे गॉडफादर आहेत का? असाही सवाल केला आहे. त्यांनी आमदार  पळवले म्हणून शिवसेना संपत नाही, ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत .तोपर्यंत शिवसेना संपणार नाही . जे गेले ed ला  घाबरून गेले, त्यांना लवकरच पश्चाताप होईल . असे सूचक विधानही त्यांनी केलं आहे. तसेच ते काल कोश्यारी काय बोलले त्याचा कोणी निषेध केला का ? भाजपच्या ताटाखाली बसलेले मांजरं आहेत ती, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांवरही पलटवार

तर एकनाथ शिंदे म्हणतात भोंगा बंद झाला. मात्र याच भोंगाच्या जीवावर शिंदे हे नगर विकास मंत्री होते. भोंगा बंद झाला असता तर तुम्ही घरी बसला असतात, असा पलटावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. सामनाचा अग्रलेख आणि सामनाचा संपादकीय गेल्या अनेक तीस वर्षापासून सुरू आहे. तसाच खणखणीत निघेल, असेही त्यांनी बजावलं आहे.

ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून घरी आले

तसेच उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत कुटुंबप्रमुख आहेत. आमचे प्रमुख म्हणून ते घरी आले. माझ्या 84 वयाच्या आईला दिलासा दिला. पक्षासाठी, संघटनेसाठी आज ईडीच्या जेलमध्ये संजय राऊत आहेत. त्यामुळे आज घरी ते दिलासा देण्यासाठी आले ते गरजेचं होतं.  सर्व कुटुंबीयांशी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असा मोठा दिलासा उद्धव ठाकरे यांनी दिला, असेही त्यांनी सांगितलं.

काल नेमकं काय घडलं?

20 ते 22 ed चे अधिकारी घरी आले होते .सर्व घर सर्च करून काही डॉक्युमेंट्स घेतले . तेच डॉक्युमेंट त्यांच्याकडे देखील अगोदर पासून होते .सर्व ड्रामा बाजी आहे संजय राऊत यांचा आवाज बंद होणे शक्य नाही. आज इडीने खोटी डॉक्युमेंट्स सादर केले .संजय राऊत हा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत आहे. त्यांनी शिवसेनेचे प्रेम कमवलं आहे, अख्या महाराष्ट्र मध्ये एक अंगार होता, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.