Ed Arrested Sanjay Raut : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी, कोर्टात घमासान युक्तीवाद, अडचणी वाढल्या

त्यांना आज ईडीने कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानेही त्यांना कोठडी मुक्कामी पाठवलं (Sanjay Raut Ed Custody) आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी सध्या आमने-सामने आलेले आहेत.

Ed Arrested Sanjay Raut : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी, कोर्टात घमासान युक्तीवाद, अडचणी वाढल्या
Ed Arrested Sanjay RautImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 3:55 PM

मुंबई : रोज सकाळ आपल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपवर (BJP) रोज टीकेचे बांध सोडून भाजपला घायाळ करणारा शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण सध्या जेलमध्ये आहे. कारण काल पंधरा तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत (ED Arrested Sanjay Raut) यांना रात्री उशिरा ईडीने अटक केली आहे. गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ही कारवाई केवळ सुडापोटी होत आहे, माझा या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलंय. तसेच अशा दबाला कधीही झुकणार नाही, शिवसेना कधीही सोडणार नाही, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली आहे.  त्यांना आज ईडीने कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानेही त्यांना कोठडी मुक्कामी पाठवलं. येत्या 4 ऑगस्टपर्यंत राऊतांना ईडीची कोठडी दिली आहे. (Sanjay Raut Ed Custody) आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी सध्या आमने-सामने आलेले आहेत.

ईडीला राऊतांच्या घरी काय सापडलं?

काल दिवसभर संजय राऊत यांच्या घरी झालेल्या धाडसत्रादरम्यान ईडीने तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. मात्र या बंडल वरती एकनाथ शिंदे अयोध्या, असा असे आढळून आल्याने याबाबत ही नेमका सस्पेन्स तयार झाला आहे. तर याबाबत राऊतांनाच विचारा असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दुसरीकडे ईडीने राऊतांच्या घरून काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याची ही माहिती देण्यात आली आहे. तसेच या आधीच राऊतांच्या अनेक मालमत्तांवरती ही जप्ती आणण्यात आली होती. भाजपने देखील याच प्रकरणात संजय राऊतांवरती वारंवार गंभीर आरोप होत होते.

मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

तर ज्यांनी आम्हाला त्रास दिला ते आपल्या कर्माने जातील असे सूचक विधान कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत केलं आहे.  संजय राऊत यांना गुन्हेगार म्हणून अटक केलीय. एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम घरी सापडणे योग्य नाही. ही लढाई स्वातंत्र्याची नाही तर गैर व्यवहार झाला म्हणून ईडीची चौकशी करत आहे, अशी प्रतिक्रिया यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

हा संजय  राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका ही विरोधकांकडून होत आहे. तर या कारवाईत भाजपचा काहीही हस्तक्षेप नाही, असे स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. कधीही झुकणार नाही, जे ईडीला आणि सीबीआयला घाबरून शिंदेंसोबत गेले, त्यांना लाज वाटली पाहिजे, अशीही टीका संजय राऊत यांच्याकडून बंडखोर आमदारांवर करण्यात आलीय. मात्र आता राऊतांचा हा कोठडी मुक्काम आणखी किती दिवस वाढतोय हेही पाहणं तिकेच महत्वाचं ठरणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.