संजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाची मनाई नाही, सुनील राऊतांकडून स्पष्ट; VIP लोकांसाठीची प्रोसेस पूर्ण करावी लागणार

जेल प्रशासनाचं म्हणणं होतं की ते VIP आहेत, त्यामुळे काही प्रोसेस असते ती पूर्ण करुन त्यांची भेट घ्या. त्यामुळे मी उद्या किंवा परवा प्रोसेस पूर्ण करुन संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं सुनील राऊतांनी सांगितलं.

संजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाची मनाई नाही, सुनील राऊतांकडून स्पष्ट; VIP लोकांसाठीची प्रोसेस पूर्ण करावी लागणार
संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने आता दोष आरोपपत्र दाखल केले आहे.Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 11:30 PM

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिवसेना नेत्यांना, तसंच बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना जेल प्रशासनानं भेटीची परवानगी दिली नाही, अशी बातमी सकाळी आली. त्यावरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. शिवसेना नेत्यांकडून भाजपवर आणि सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र, संजय राऊत यांना भेटण्यास जेल प्रशासनाने (Jail Administration) मनाई केली नाही, असं सुनील राऊत यांनीच स्पष्ट केलंय. संजय राऊत यांना भेटण्यास मनाई केली नाही. जेल प्रशासनाचं म्हणणं होतं की ते VIP आहेत, त्यामुळे काही प्रोसेस असते ती पूर्ण करुन त्यांची भेट घ्या. त्यामुळे मी उद्या किंवा परवा प्रोसेस पूर्ण करुन संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं सुनील राऊतांनी सांगितलं.

संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. कारागृह प्रशासनाने या नेत्यांना राऊतांना भेटण्यासाठी मनाई केली. आज सकाळी संजय राऊत यांचे धाकटे बंधू -शिवसेना आमदार सुनील राऊत आणि शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात गेले होते. मात्र तुरुंग प्रशासाने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला, अशी बातमी बुधवारी सकाळी समोर आली होती. मात्र, भेट नाकारण्याचा प्रश्न नाही, VIP लोकांच्या भेटीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मुद्दा होता, असं सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘आज जे शिवसेनेबरोबर केलं ते उद्या यांच्यासोबतही होणार’

संजय राऊत सच्चा माणूस आहे. त्याची हार होणार नाही याची खात्री आम्हाला आहे. न्यायालयीन लढाई आम्ही लढत राहू. जे आरोप केले गेले ते आरोप कसे खोटे ठरतील याची संपूर्ण तयारी आम्हीही करु, असा दावाही सुनील राऊत यांनी केलाय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन सुनील राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांवर टीका केलीय. यांचे 40 आणि अपक्ष आमदारांना ते खूश ठेवू शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. आज जे शिवसेनेबरोबर केलं ते उद्या यांच्यासोबतही होणार. आता आम्ही आरामात आहोत. आम्हाला खात्री आहे पुढचं सरकार शिवसेनेचं येणार, अशा शब्दात सुनील राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांवर हल्ला चढवला.

‘आमच्या विरोधात जे चाललं ते एक दिवस उलटं फिरेल’

आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने संजय राऊत यांची भेट नाकारल्यानंतरही सुनील राऊत यांनी आमचाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कोर्टाची लढाई आम्ही सुरु केली आहे. 22 तारखेपर्यंत मुदत आहे. वकिलांशी भेटून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ… तसेच संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून अग्रलेख लिहिण्यावरही ईडीने आक्षेप घेतलाय. यावरून सुनील राऊत म्हणाले, ‘ ते काहीही करू शकतात. सज्जन माणसाला अडकवू शकतात. चांगल्या माणसाची जिंदगी बरबाद करू शकतात. त्यांच्याकडून याच अपेक्षा आहे. सत्य परेशान हो सकता है.. पण पराजित नाही. एक वरची शक्ती काम करत असते. त्यामुळे हे जे काही चाललंय आमच्या विरोधात हे सर्व एक दिवस उलटं फिरेल, असा इशारा सुनील राऊत यांनी दिला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.