वाशिम : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणुका होण्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही राऊतांच्या सूरात सूर मिसळले. (Sanjay Raut Jayant Patil concern on Maharashtra Assembly Speaker Election)
काँग्रेसला पाच वर्षासाठी विधानसभा अध्यक्षपद दिलं होतं. काँग्रेसने एकाच वर्षात राजीनामा दिला, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. संजय राऊत यांना निवडणूक पुन्हा होणार, याबद्दल एकच काळजी वाटत असेल, तर ती सर्वांनाच वाटत आहे, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
“शरद पवार म्हणाले, की विधानसभा अध्यक्षपद खुलं झालं आहे, त्यामुळे पुन्हा चर्चा होईल. सरकार स्थापन करताना पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद ठरलं होतं, तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील, हे कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे तीन पक्ष एकत्र निर्णय घेतील. तीन पक्षांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे, त्यामुळे हा प्रकार टाळायला हवा होता” अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.
“निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे”
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतराबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, “तुमच्या चेहऱ्यावर जसं हास्य आहे, तसं महाराष्ट्राच्याही चेहऱ्यावर आहे, रोजच सत्तेत येण्यासंबंधी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
नाना पटोले यांनी राजीनामा दिला असला तरी निवडणुकीच्या वेळी सरकारकडे 172 ते 173 आमदार आहेत, तसेच भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला. (Sanjay Raut Jayant Patil concern on Maharashtra Assembly Speaker Election)
”माणिकराव ठाकरेंना विचारा”
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबद्दल माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना जास्त माहिती असेल, पण आमच्याकडे अद्याप हा विषय आला नाही, असं पाटलांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य अंधारात गेले, असे वाटते. त्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या. दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत, मात्र देशाचा नेता खिळे ठोकून घेत आहे. जे काम पाकिस्तान आणि चीन सीमेवर व्हायला पाहिजे, तटबंदी किंवा बॅरिकेट लावायला पाहिजे, तेच दिल्लीच्या सीमेवर केले जात आहे, असा घणाघातही जयंत पाटील यांनी केला.
संबंधित बातम्या :
आधी फडणवीस म्हणाले फासा आम्हीच पलटणार, आता संजय राऊत म्हणतात…
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?
काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही : सामना
(Sanjay Raut Jayant Patil concern on Maharashtra Assembly Speaker Election)