“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नासाठी तारीख पे तारीख का?”, संजय राऊतांचा सवाल
खासदार संजय राऊत यांचं महाराष्ट्र-कर्नाटक सीमवादावर भाष्य...
मुंबई : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमवाद (Maharashtra Karanataka Seemavad) दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडवू शकतं. पण 20 ते 25 लाख नागरिकांचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत मात्र तारीख पे तारीख सुरू आहे. सीमाप्रश्न आणि महाराष्ट्रातील घटना बाह्य सरकारची केस असेल त्याच्यावर मात्र तारखांवर तारखा मिळत आहेत. हे योग्य नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
सीमा भागामध्ये कर्नाटकचे पोलीस धुडगूस घालत आहे. तिकडे कायदा सुव्यवस्थेसाठी राज्य पोलीस दलाचा पोलीस फाटा मागे घेऊन सेंट्रल फोर्स तैनात केली पाहिजे. हे केंद्रीय गृहमंत्रीच करू शकतात. त्यांनी ते करावं, असं राऊत म्हणालेत.
पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्री सीमावादाबाबत मध्यस्थी केली पाहिजे. कारण दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाचा सरकार आहे. बोम्मई असे म्हणतात अमित शहा भेटून काहीच फायदा नाही. परंतु आम्ही बोलत आहे की फायदा आहे, असं राऊत म्हणालेत.
अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत. सीमाभागाचे सर्वात जास्त चटके कोल्हापूरला बसत असतात.त्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती असेल. न्यायालयात अनेक प्रकरण आहे. शाहा यांनी यात मध्यस्थी करावी, असं राऊतांनी म्हटलंय
मराठी भाषा मराठी संस्कृती या संदर्भात अधिकारवानीने आदेश देण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना आहेत. त्यामुळे गृहमंत्री खरंच मध्यस्थी करत असतील. त्यातून सकारात्मक बदल होणार आहे निर्णय होणार आहे तर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही. सीमाभागातील मराठी नागरिकांवरती अन्याय होतोय. तेथील निर्णय घेतला पाहिजे, असं राऊत म्हणालेत.