पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

राष्ट्रपती राजवट हा भाजपचा डाव आहे, पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 08, 2019 | 10:15 AM

मुंबई : पडद्यामागे ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवण्याचा भाजपचा डाव आहे, असा सनसनाटी आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on BJP Karnatak Pattern) यांनी केला आहे. शरद पवार दिल्लीसमोर झुकले नाहीत, शिवसेनाही झुकणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला. सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना संजय राऊत यांनी अग्रलेख आणि ट्वीट यांच्यापाठोपाठ सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेण्याची गेल्या काही दिवसांची परंपरा अखंडित ठेवली.

दिल्लीसमोर ना शरद पवार झुकले, ना उद्धव ठाकरे झुकणार. राष्ट्रपती राजवट हा भाजपचा डाव आहे, पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही. महाराष्ट्र कुणालाही घाबरत नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार बनवावं. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार चालवावा, पण सूत्र हलवू नयेत. हा महाजनादेशाचा अपमान आहे. संविधानानुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागणार, असंही संजय राऊत म्हणाले.

अयोध्येबाबत आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल. तो सर्वांना मान्य करावाच लागेल, असंही राऊत म्हणाले.

भाजपमध्ये संजय राऊतांबद्दल तीव्र नाराजी, माफीची मागणी?

राज्यपाल उद्यापासून राज्याचा कारभार सांभाळतील, त्यामुळे आम्हाला त्यांनाच भेटावं लागेल, आणि ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांनाही महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपला दिला.

नितीन गडकरी मुंबईचे रहिवासी आहेत, त्यांचं घर वरळीत आहे, ज्यांचं घर मुंबईत आहे त्यांनी मुंबईला येणं ही काही बातमी नाही. नितीन गडकरींकडे मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलं लिखित पत्र असेल तर मला सांगावं, मी उद्धव ठाकरेंना कळवतो. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तिसऱ्या व्यक्तीने मध्ये पडण्याचं कारण नाही, असं संजय राऊत म्हणाले.

अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मला खूप आवडते, त्यामुळे ती ट्वीट केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. गेले काही दिवस ट्विटरवर कविता पोस्ट करण्यावरुन कालच पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला होता. त्यावर दुष्यंत कुमार हे आपले आवडते कवी आहेत, पुढील काळात वाजपेयींच्याही कविता शेअर करेन, असं ते म्हणाले होते. (Sanjay Raut on BJP Karnatak Pattern)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.