“भाजपने आदित्य ठाकरे यांची माफी मागावी”, संजय राऊत यांनी अशी मागणी का केली?
संजय राऊत यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय.
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय. भाजपने आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, असं संजय राऊत म्हणाले आहेत. दिशा सालियन (Disha Salian Death case) मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचं सीबीआयनं (CBI) आपल्या अहवालातून स्पष्ट केलंय. या प्रकरणात भाजपकडून आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात होतं. या प्रकरणाचा सीबीआय रिपोर्ट समोर आल्यानंतर राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. माफीची मागणी त्यांनी केलीय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अनेक दावे प्रतिदावे केले गेले. तत्वकालिन विरोधी पक्ष भाजपने आदित्य ठाकरेंचा या प्रकरणासी संबंध जोडला. पण आता या प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे.
दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचं सीबीआयनं आपल्या अहवालातून स्पष्ट केलंय. तसंच दिशाच्या मृत्यूचा सुशात सिंह राजपूत याच्या मृत्यूशीही संबंध जोडण्यात आला. पण आता या अहवाला दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितला आहे. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रात अत्यंत कमजोर हतबल सरकार आहे, त्यामुळे वाद निर्माण होत आहेत. त्यांना महाराष्ट्र माहीत नाही. महाराष्ट्र समजला नाही. शिंदे सरकार लवकरात लवकर सत्तेत घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्याराज्याचे हस्तक राहणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.