“पक्ष आमचा, नेता आमचा, हिंमत असेल तर स्वत:चं अस्तित्व निर्माण करा!”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.

पक्ष आमचा, नेता आमचा, हिंमत असेल तर स्वत:चं अस्तित्व निर्माण करा!, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना आव्हान
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 11:46 AM

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. सेनाभवन शिंदेगटाच्या ताब्यात घेणार असल्याचा दावा शिंदेगटाकडून (CM Eknath Shinde) केला जातोय. त्यावरही राऊत बोललेत. सेनाभवन घेणार असं बोलणाऱ्यांनी हिंमत असेल तर स्वतः चं सेनाभवन निर्माण करावं, असं राऊत म्हणालेत.

पक्ष शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालयं आमची… मग तुम्ही काय केलं? स्वतः च्या मुलांना जन्म द्या दुसऱ्यांची मुलं खेळवू नका, असं म्हणत राऊतांनी शिंदेवर घणाघात केलाय.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरही राऊत यांनी भाष्य केलंय. बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होते आहे? तिथलं सरकार कानडी संघटना मराठी भाषा मराठी माणसावर अन्याय करत आहेत. सुप्रीम कोर्टाने ठेवण्याचे आदेश पाळले जात नाहीत. हा प्रदेश केंद्रासाठी करावा तिथल्या मराठी लोकांनवरील अन्याय थांबावे थांबावे ही त्यासाठी मागणी आहे, असं राऊत म्हणालेत.

कर्नाटक सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये देशातील सर्व प्रांतातील लोक येऊन राहत आहेत. कानडी बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. आमचा कानडी लोकांना विरोध आहे का? नाही. मग मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का केली जात आहे? अशी मागणी करणारे मूर्ख आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. राऊतांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबाई यांच्या दुःखद निधन झाल्याच्या समजला आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो.पण त्यांचं आज निधन झालं ते समृद्ध आयुष्य जगल्या त्यांना उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभलं.अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या मुलांचा संगोपन केलं मुलांना वाढवलं.र नरेंद्र मोदी हे पक्षाचे सर्वोच्च नेते झाले नंतर पंतप्रधान झाले. कितीही सर्वोच्चपदावर एखादी व्यक्ती पोहोचली तरी आईचं छत्र गमवतं वेदनादायी असतं. तेव्हा ती व्यक्ती अनाथ होते. संपूर्ण ठाकरे परिवार शिवसेना परिवार महाराष्ट्राची जनता या दुःखद प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या मोदी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं राऊत म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.