Eknath Shinde : “डोंगर, झाडी”, गुलाबराव पाटलांचा व्हीडिओ, केसरकरांना सल्ला, संजय राऊतांचं एक ट्विट तीन निशाणे…

Sanajy Raut : संजय राऊत यांनी एका ट्विटमधून तीन निशाणे मारलेत.

Eknath Shinde : डोंगर, झाडी, गुलाबराव पाटलांचा व्हीडिओ, केसरकरांना सल्ला, संजय राऊतांचं एक ट्विट तीन निशाणे...
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 9:56 AM

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणखीच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शहाजी पाटील या तिघांवर निशाणा साधला आहे. ‘बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!”,असं ट्विट राऊतांनी केलं आहे.

गुलाबराव पाटलांचा व्हीडिओ

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी गुलाबराव पाटलांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात गुलाबराव पाटील आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. पक्ष बदलणाऱ्यांवर बरत आहेत. त्यांचा हाच व्हीडिओ शेअर करत राऊतांनी बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा… असं म्हटलंय.

केसरकरांना सल्ला

याच ट्विटमध्ये राऊतांनी दीपक केसरकर यांना संयमी राहण्याचा सल्ला दिलाय. श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा, असं राऊत म्हणाले आहेत.

“डोंगर, झाडी”

सांगोल्याचं आमदार शहाजी पाटील हे सध्या शिंदे गटासोबत गुवाहाटीला आहेत. तिथून त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन केलं. काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल असं पाटील म्हणाले. त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राऊत बोललेत. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका, असा सल्ला त्यांनी पाटलांना दिलाय.

आज कोर्टात सुनावणी

महाराष्ट्रातील राजकीय राडा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.