Eknath Shinde : एकनाथ शिंदे आजही आमच्या जवळचेच आहेत -संजय राऊत
"महाराष्ट्रातही झाडी डोंगर, झाडी, हॉटेल सगळं आहे, तुम्ही परत या", अशी आर्त सादही संजय राऊतांची शिंदे गटाला घातली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज बरोबर आठवडा पूर्ण झाल्यानंतरही संजय राऊतांनी (Sanjay Raut) एकनाथ शिंदे आजही आमच्या जवळचेच आहेत, असं म्हटलं आहे. “महाराष्ट्रातही झाडी डोंगर, झाडी, हॉटेल सगळं आहे, तुम्ही परत या”, अशी आर्त सादही संजय राऊतांची शिंदे गटाला घातली आहे. त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
‘एकनाथ शिंदे आमचेच’
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंड केलंय. अश्यात त्यांचा बंडाचा शिवसेनेकडून निषेध करण्यात येतोय. त्यांच्यावर सडकून टीका होतेय. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचं बोललं जातंय. अश्यात संजय राऊतांनी मात्र एकनाथ शिंदे हे आमच्या जवळचे आहेत, असं राऊत म्हणालेत.
‘तुम्ही परत या’
संजय राऊतांनी शिंदे गटाला परत येण्याचं आवाहन केलं आहे. सांगोल्याचं आमदार शहाजी पाटील हे सध्या शिंदे गटासोबत गुवाहाटीला आहेत. तिथून त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन केलं. काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल असं पाटील म्हणाले. त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राऊत बोललेत. “महाराष्ट्रातही झाडी डोंगर, झाडी, हॉटेल सगळं आहे, तुम्ही परत या”, अशी आर्त सादही संजय राऊतांची शिंदे गटाला घातली आहे.
राऊतांचं आक्रमक ट्विट
‘बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!”,असं ट्विट राऊतांनी केलं आहे.
बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र! pic.twitter.com/8yb33kHFOc
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022