“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही!”
संजय राऊतांचं आक्रमक ट्विट...
मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka) पुन्हा एकदा चिघळला आहे. काल महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आज महाराष्ट्राच्या वाहनांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे एकच संतापाचं वातावरण आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanajay Raut) यांनी आक्रमक ट्विट केलं आहे. यात त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे.
दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.
दिल्लीचया पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
“मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले.स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढपणा आहे!”, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलंय…
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले . स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढ पणा आहे
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. ठाकरे गटाचे खासदार दोन मागण्या करणार आहेत.राज्यपालांना हटवण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार करणार असल्याची माहिती आहे. सीमा प्रश्नाबाबत चर्चा करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार करणार आहेत. खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.