Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jai Bhavani Jai Shivaji | छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचं तोंड बंद का? : संजय राऊत

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला

Jai Bhavani Jai Shivaji | छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचं तोंड बंद का? : संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 12:15 PM

मुंबई : खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्यामुळे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut on MP Udayanraje Bhosale slogans Jai Bhavani Jai Shivaji in Rajyasabha)

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरु झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही. जय भवानी! जय शिवाजी!!!!!!!” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली.

“I Udayanraje Pratapsinhraje Bhosale…” अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत खासदार उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये” अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या अनिल दवे यांनी घेतली आहे.

“नायडू आणि भाजपने आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी” अशी मागणी अनिल दवे यांनी केली आहे.

हेही वाचा : व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

व्यंकय्या नायडू आणि केंद्रातील भाजप सरकारचा जालन्यात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहिलेली वीस लाख पत्रे जालना जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोस्टकार्ड पत्र पाठवले.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपची असलेली खोटी भावना स्पष्ट दिसली” असे म्हणत व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा शिवसेनेच्या वतीने निदर्शने देण्यात आली.

संबंधित बातम्या :

इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा, पवारांना सोळावी शपथ

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ, काँग्रेस नेता म्हणतो आता शिवसैनिक शोभता!

(Sanjay Raut on MP Udayanraje Bhosale slogans Jai Bhavani Jai Shivaji in Rajyasabha)

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....