“राहुल गांधींनी एवढ्या व्यस्ततेतून मला फोन केला आणि म्हणाले…”, संजय राऊतांचं ट्विट

| Updated on: Nov 21, 2022 | 10:07 AM

राऊतांचं ट्विट...

राहुल गांधींनी एवढ्या व्यस्ततेतून मला फोन केला आणि म्हणाले..., संजय राऊतांचं ट्विट
Follow us on

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस शिवसेना यांच्यातील नातं किती घट्ट आहे, हे सांगणारं ट्विट केलंय. यात त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्याला फोन करून चौकशी केल्याचं सांगितलं आहे. “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय…”, असं ट्विट संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलंय.

राहुल गांधीनी आपल्या प्रकृतीची चौकशी केल्याचं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्याचसोबत माणुसकीचा ओलावा संपत चाललेला असताना राहुल गांधींचा फोन येणं नात्यातील ओलावा दर्शवत असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना अटक करण्यात आलं होतं. 110 दिवस ते तुरुंगात होते. काही दिवसांआधी त्यांना जामीन मिळाला. त्यांच्या जामीनानंतर राहुल गांधी यांचा त्यांना फोन जाणं महाविकास आघाडीतील संवादाचं द्योतक आहे.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. तसंच राष्ट्रवादीचे नेतेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचा राऊतांना फोन आला आहे.