“ज्यांच्यावर विनयभंगापासून ते बलात्कारापर्यंतचे आरोप त्यांना आदित्य ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार नाही”
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत राऊत काय म्हणाले? वाचा...
नवी दिल्ली : शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) आदित्य ठाकरे यांचं नाव असल्याचा आरोप केला. त्यानंतर राजकारण चांगलच तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केलंय. ज्यांच्यावर विनयभंगापासून बलात्कारापर्यंतचे आरोप आहेत, त्यांनी हे असले आरोप आदित्य ठाकरेंवर टीका करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
सध्या राज्याच्या राजकारणात सध्या दळभद्रीपणा सुरू आहे. सुशांत सिंह राजपुत यांची हत्या होती, हे सीबीआयने सांगितली आहे. ज्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचे आरोप आहेत त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का? जो सदस्य सदनात नसतो त्याचं नाव घेता येत नाही. शेवाळे यांनी नियम मोडत आदित्य ठाकरेंवर आरोप केलेत, असं राऊतांनी म्हटलंय.
सुशांतसिंह राजपूत केसबाबतही राहुल शेवाळे यांनी भाष्य केलंय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते AU यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय, म्हणून हा प्रश्न मी उपस्थित केला, असं शेवाळे म्हणालेत.
राहुल शेवाळे यांच्या या आरोपांवर संजय राऊतांनी उत्तर दिलंय.
फाईल्सबद्दलच बोलायचं झाल्यास अशा कितीही फाइल निघतील. फाईल्सची लढाई सुरु झाली तर महागात पडेल, असं राऊतांनी म्हटलं आहे.