Sanjay Raut : संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा! म्हणाले, ‘बोलण्याची प्रॅक्टीस…’
'राऊतांना अटक होईल, असं भाकित करणाऱ्या राज ठाकरे यांना मला सांगायचं...' पाहा संजय राऊत काय म्हणाले?
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut News) यांना बुधवारी जामीन मिळाला. बुधवारीच ते न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले. दरम्यान, आज त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका भाषण संजय राऊत यांना अटक होईल, असं भाकित वर्तवलं होतं. त्यांचा संदर्भ देत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी म्हटलं की,…
राज ठाकरेंनी एका भाषणात टीका करताना सांगितलं होतं की ‘राऊतांना अटक होईल. त्यांनी एकांतात स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टीस करावी.’ मला त्यांचा सांगायचंय की राजकारणात आपला शत्रू तुरुंगात जावा अशी कुणाचीही भावना असू नये!
हे सुद्धा वाचा
यावेळी संजय राऊत यांनी वीर सावरकर यांचाही उल्लेख केला. सावकरांपासून आणीबाणीचे अनेक नेते तुरुंगात होते. माझी अटक बेकायदेाशीर होती, असं कोर्टानं म्हटलंय. तुरुंगातील अनुभव सांगण्यासारखा नाही. पण एकांताचा हा काळ सत्करणी लावल्याचंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.
पाहा व्हिडीओ :
राजकारणात तुरुंगात जावं लागतं, मीही गेलो, असं म्हणत त्यांनी टिळक आणि वाजपेयी यांचाही उल्लेख केला. लोकमान्य टिळक सहा वर्ष कसे तुरुंगात राहिले? वाजपेयी कसे राहिले? याचा मी विचार करत होतो, असंही संजय राऊत म्हणालेत.
भाजपच्या विरोधात आपला लढा सुरुच राहिल, असंही संजय राऊत यांनी वेळी ठणकावून सांगितलं. सध्या आपली प्रकृती खराब आहे. तुरुंगातही होती आणि आजही आहे, असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मी जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. पण याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून नंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले.