Sanjay Raut: बंडखोर थांबलेलं हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर, संजय राऊतांचं वक्तव्य, अर्धे एलिमिनेट होणारच

Sanjay Raut Speech in Dahisar Video : या मेळाव्यात तुफान घोषणाबाजी करत बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली.

Sanjay Raut: बंडखोर थांबलेलं हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर, संजय राऊतांचं वक्तव्य, अर्धे एलिमिनेट होणारच
पाहा काय म्हणाले संजय राऊत...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 1:20 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Speech in Dahisar) यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर (Rebel Shiv sene MLA) जोरदार टोला लगावला आहे. ज्या हॉटेलात बंडखोर शिवसेना आमदार राहिलेले आहेत, ते तर बिग बॉसचं घर असल्याचं सारखं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. दहिसरमध्ये (Maharashtra Political Crisis) आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या युवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरात जसं एक एक स्पर्धक एलिमिनिटे होतात, तसेच या हॉटेलातील अर्धे आमदार एलिमिनिटे होतील, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सडेतोड उत्तर देताना संजय राऊतांनी सर्व आमदारांचा समाचार घेतलाय.

राऊतांची फटकेबाजी

शिवसेनेचा दहिसरमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यात तुफान घोषणाबाजी करत बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र संताप बंडाविरोधात व्यक्त केला. यावेळी संजय राऊतांनी आपल्या खास शैली बंडखोर आमदारांना सुनावलं. एकूण 50 आमदार एकनाथ शिंदेसोबत सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलात आहेत. गेले पाच दिवस त्यांना तिथंच मुक्कम आहे. या आमदारांच्या हॉटेलातील आतमध्ये व्हिडीओ फोटो पाहून नेमकं काय वाटतंय, याची खिल्ली संजय राऊत यांनी आपल्या भाषणात बोलताना उडवली.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

बंडखोरी केल्यानंतर संकटाचे ढग दाटलेल्या शिवसेनेचा गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक पवित्रा पाहायला मिळालाय. यानंतर शनिवारीही शिवसेनेचा युवा मेळावा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दहिसरमध्ये युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या युवा मेळाव्यात बोलताना संजय राऊतांनी सर्व बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा मुंबई येऊन दाखवण्याचं आव्हान दिलंय.

संजय राऊतांच्या भाषणातील ठळक वक्तव्य :

  • गुलाबराव पाटील मोठमोठी वक्तव्य करायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळालाय. सांदीपन भुमरे, वॉचमन होता. याला वडा सांबार घात येत नव्हता, जमिनीवर बसून वडा सांबार खात होता. आज कॅबिनेट मंत्री झाला. शिवसेनेमुळे मी झालो, म्हणून रडायला लागला, हे सगळे खोटे अश्रू होते..प्रकाश सुर्वे, भाजी विकत होता ना… पुन्हा भाजी विकतायला पाठवूया.. हे सगळे धुंदीत .. महाराष्ट्राचा बिग बॉस आजही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेएत..
  • मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे म्हणून शिवसेना तोडायचीये
  • शिवसेनेत यायचं, शिवसेनेचं संरक्षण घ्यायचं, प्रॉपर्ट्या करायच्या आणि त्याच पैशांनी शिवसेनेवर वार करायचे! उद्धव ठाकरेंना सांगितलंय, की ही घाण आता पुन्हा आपल्यात घेऊ नका.. बाहेरुन येतात आणि आम्हाला शहाणपणा शिकवता?
  • दिघे आम्हाला सांगू नका, गद्दारांना क्षमा नाही, हे दिघेंचं स्टेटमेन्ट मी लिहून घेतलेयं.. तेव्हा हे कुठे होते अधर्मवीर.., आता मर्सिडीज रिक्षा चालवतात…
  • शिवसेनेला एकच बाप आहे, आणि कुणाला बाप चोरता येत नाही.. आणि ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाय.
  • ही 40 लोकं आहेत ना जी जिवंत प्रेतं आहेत, लटपटतायत तिकडे, यांचा आत्मा मेलेलाय.. आता यांना येऊन दाखवा.. यांनी येऊनच दाखवावं.. माझं चॅलेजंच आज..
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.