Sanjay Raut Political Journey : पत्रकार, संपादक ते शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ; कसा आहे संजय राऊत यांचा राजकीय प्रवास?

तब्बल साडे नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. आता संजय राऊत यांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. अशावेळी संजय राऊत यांचा पत्रकार, सामनाचे संपादक ते शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ हा संपूर्ण प्रवास जाणून घेणं महत्वाचं आहे.

Sanjay Raut Political Journey : पत्रकार, संपादक ते शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ; कसा आहे संजय राऊत यांचा राजकीय प्रवास?
संजय राऊत, खासदार, शिवसेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 5:19 PM

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक, महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारच्या स्थापनेचा प्रमुख चेहरा, केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) कारवाईविरोधात उघडपणे विरोधी भूमिका मांडणारा शिवसेनेचा मुख्य चेहरा म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut). याच संजय राऊतांना आड अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळी सात वाजताच ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. तब्बल साडे नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. आता संजय राऊत यांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. अशावेळी संजय राऊत यांचा पत्रकार, सामनाचे संपादक ते शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ हा संपूर्ण प्रवास जाणून घेणं महत्वाचं आहे.

2019 च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणाऱ्या दोन नेत्यांपैकी एक म्हणजे संजय राऊत. या संपूर्ण काळात भाजपने अनेकप्रकारे शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी सातत्याने पत्रकारपरिषदा घेत भाजपच्या ‘अरे’ ला ‘कारे’ ने प्रत्युत्तर देऊन प्रत्येक वार पलवटून राहिला. तेव्हापासून संजय राऊत यांनी शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची जागा काबीज केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेत असणाऱ्या इतर प्रमुख नेत्यांच्या तुलनेत संजय राऊत यांनी बराच पुढचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजघडीला शिवसेनेच्या संघटनात्मक राजकारणात संजय राऊत यांचा दबदबा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कोण आहेत संजय राऊत?

संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.

क्राईम रिपोर्टर ते नेता

संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या काळात त्यांनी अनेक सनसनाटी बातम्यांचे वृत्तांकन केले होते. या काळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. संजय राऊत यांची भूमिका शिवसेनेशी मिळतीजुळती असल्याचे बाळासाहेबांना वाटायचे. त्यामुळे दैनिक सामना सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना बोलावून घेतले. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले.

शिवसेनेत विशेष स्थान

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संजय राऊत शिवसेनेत आहेत. मात्र, अजूनही ते कालबाह्य किंवा बाजूला सारले गेलेले नाहीत. संजय राऊत यांनी आजपर्यंत थेट कोणती निवडणूक लढवली नसली तरी मातोश्रीच्या दरबारातील त्यांचे स्थान आजही कायम आहे. परिस्थितीची, काळाची गरज ओळखून ते पक्षासाठी भूमिका घेतात, हे पक्षाला माहीत आहे.

बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा सामनाचे संपूर्ण अधिकार संजय राऊत यांच्या हातात देण्यात आले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला दम भरणारा नेता

संजय राऊत यांनी स्वत:च एका मुलाखतीमध्ये आपण कुख्यात गुंड दाऊदशी बोलल्याचे सांगितले होते. आता अंडरवर्ल्ड राहिलेलं नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अंडरवर्ल्ड काय होतं हो आम्ही पाहिलेलं आहे. त्या काळात मुंबईचं अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत. मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमही दिला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले होते.

राज ठाकरेंचं राजीनामापत्र लिहिलं

राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र संजय राऊत यांनी लिहिलं होतं. बाळासाहेबांना राऊत यांच्या लिखाणाची शैली माहीत होती. राज यांचं राजीनामापत्र बाळासाहेबांच्या हातात पडताच त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं. संजय, हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते. नंतर राज ठाकरेंना समजवण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती. त्यावेळी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, ऐनवेळी संजय राऊत यांनी माघार घेऊन शिवसेनेतच राहणे पसंत केल्याचे सांगितले जाते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.