Sanjay Raut Press Conference : भाजप-ईडीवर तुटून पडण्यापूर्वी राऊतांना कुणा कुणाचा फोन? राऊतांनी ‘बाप’ काढत नावं सांगितली
संजय राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद पाहत आहेत. मी इथूनच त्यांना नमस्कार करतो. नुकताच त्यांचा फोन येऊन गेला, शरद पवार यांचाही काही वेळापूर्वी फोन आला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन मला येऊन गेले. त्या सगळ्यांनी या पत्रकार परिषदेसाठी, मला आशीर्वाद दिले आहेत, असं राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाभवनातून भाजपविरोधात एल्गार पुकारलाय. राऊत यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद पाहत आहेत. मी इथूनच त्यांना नमस्कार करतो. नुकताच त्यांचा फोन येऊन गेला, शरद पवार यांचाही काही वेळापूर्वी फोन आला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन मला येऊन गेले. त्या सगळ्यांनी या पत्रकार परिषदेसाठी, मला आशीर्वाद दिले आहेत, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरुवात जय महाराष्ट्रने केली. त्यावेळी राऊत म्हणाले की, मला असं वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो, अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. कारण या वास्तूला एक महत्त्व आहे. अनेक लढे याच वास्तूतून बाळासाहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही लढवले. या वास्तूनं अनेक हल्ले पचवलेत. नुसते हल्ले नाहीत, तर अतिरेकी हल्लेही पचवले. याच वास्तूच्या खाली बॉम्बस्फोट झालेत. शिवसेना प्रमुखांचे आणि आमचे सहकारी इथे उपस्थित आहेत. विनायक राऊत, आनंद अडसूळ, उदय सामंत, आदेश बांदेकर, महापौर पेडणेकर, संपूर्ण शिवसेना इथे उपस्थित आहेत.
Mumbai | Central agencies are troubling our party leaders. Pressure is being created on our leaders using these agencies. Some BJP leaders are saying that the MVA govt will fall on March 10. All these rumors started after I wrote to Venkaiah Naidu: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/0ZEIZzUhc4
— ANI (@ANI) February 15, 2022
महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही- राऊत
महाराष्ट्रावर आणि आपल्यावर जे आक्रमण सुरु आहे, त्या आक्रमणाविरुद्ध कुणीतरी रणशिंग फुकायला हवं होतं, ते आज इथून आपण फुकंतोय. बाळासाहेबांनी आपल्याला मंत्र दिलाय, ते नेहमी म्हणायचे, तू काही पाप केलं नसशील, तुझं मन साफ असेल, काही गुन्हा केला नसेल, तर कुणाच्या बापाला घाबरु नका. उद्धव याच मंत्रावर शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. आज आम्हाला संदेश द्यायचा आहे की, महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. आणि तुम्ही कितीही नामर्दासाराखे वार केले. तरी शिवसेना घाबरणार नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.
‘नायडूंना लिहिलेल्या पत्रानंतर हे सुरु झालं’
शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, रवींद्र वायकर असेल, भावना गवळी, राष्ट्रवादीतले प्रमुख अगदी पवार साहेबांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या प्रकारे हल्ले करतंय, ते फार घातक आहे. असंच पश्चिम बंगाल मध्ये आहे. तिथे राज्यपालांनी सरकारलाही जुमानलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव,, एक तर तुम्ही सरेंडर व्हा, नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. पाहा ना.. भाजपचे जे लोकं आहेत, ते रोज तारखा देत आहेत.. 170 चं बहुमत असताना भाजपचे लोकं दोन दिवसांनी एक तारीख देतात. या तारखा कुणाच्या भरवशावर देता. नायडूंना लिहिलेल्या पत्रानंतर हे सत्र पुन्हा सुरु झालंय, असा दावाही राऊत यांनी यावेळी केलाय.
‘..तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील!’
भाजपचे काही प्रमुख लोकं मला तीनदा भेटले. वारंवार मला हेच सांगितलं की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचं. आमची सगळी तयारी झालेय. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटलं हे कसं शक्य आहे? याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील! टाईट करतील हा शब्द त्यांनी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.
इतर बातम्या :