हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह कसा दिसतो? संजय राऊतांचा सवाल

संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले. Sanjay Raut Rajya Sabha

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह कसा दिसतो? संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 10:20 AM

नवी दिल्ली: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले. देशात सध्या जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवलं जातेय. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट करण्यात येत आहोत. दिल्लीच्या सीमांवर सुरु असणारं आंदोलन फक्त तीन राज्यांचं राहिलेलं नाही देशातील सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आहे, अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी राज्यसभेत मांडली. (Sanjay Raut raised question over farmer protest against farm laws at Rajya Sabha)

बहुमत अहंकारानं चालत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत.त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांनी आदर आहे. केंद्र सरकारला देशानं बहुमत दिलं आहे. पण,बहुमत अहंकारानं चालत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट केला जातोय. ही बाब देशासाठी चांगली बाब नाही. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. पंतप्रधानांसह सर्वांना दु:ख झालं आहे. लाल किल्ल्यावर अपमान करणारा दिप सिद्धू कोण आहे, तो कोणाचा माणूस आहे. तो सिद्धू आतापर्यंत पकडला गेला नाही. मात्र, 200 पेक्षा जास्त शेतकरी आंदोलक पकडले गेले आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. 100 युवा शेतकरी आंदोलक कुठं आहेत.पोलिसांनी त्यांच्यासोबत काय केलय हे सांगावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

देशप्रेमी कोण?

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. भारतात देशप्रेमी कोण आहे? अर्णव गोस्वामी देशप्रेमी आहेत का? त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी जाहीर केल्या, अशा गोष्टींना बळ देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. टीव्ही अँकर एका कॅबिनेट मंत्र्याबद्दल असं बोलतो हे योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन सुरु आहेत. ते तीन राज्यांचं आंदोलन नसून देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. पंजाब जे शेतकरी मुघलांविरोधात लढतात. कोरोना काळात लंगर चालवतात ते तेव्हा ते देशप्रेमी असतात. पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं तर देशद्रोही कसे झाले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आंदोलनही देशाची ताकद आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या

संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा

(Sanjay Raut raised question over farmer protest against farm laws at Rajya Sabha)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.