फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य,आधीची 2 आश्चर्य दिल्लीत!! संजय राऊत यांचा निशाणा नेमका कुठे?

शपथविधीच्या आठवणीने फडणवीसांना अजून दचकून जाग येते. त्याची कारणं शोधली पाहिजेत, असा सल्ला संजय राऊत यांनी दिलाय.

फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य,आधीची 2 आश्चर्य दिल्लीत!! संजय राऊत यांचा निशाणा नेमका कुठे?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 10:40 AM

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे जगातलं दहावं आश्चर्य आहे. तर आधीची 2 आश्चर्य दिल्लीत बसलेत, अशी उपरोधिक टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय वर्तुळात एकानंतर एक वक्तव्ये केली जात आहेत. काल फडणवीस यांनी यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. या शपथविधीला शरद पवार यांची मंजुरी होती. निवडणूक निकालानंतर शिवसेनेने आधी आमचा विश्वासघात केला आणि नंतर राष्ट्रवादीने केला, असा आरोप फडणवीस यांनी केला. मात्र शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केलेला नाही. फडणवीस खोटं बोलत आहेत, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. तर असं बोलणाऱ्या फडणवीसांनाच त्यांनी दहावं आश्चर्य अशी उपमा दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य आहे. दोन आश्चर्य दिल्लीत बसले आहेत. हे दहावं महाराष्ट्रात आहे. माणसानं किती खोटं बोलावं.. अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याचं आपण मान्य केलं होतं. हॉटेल व्ह्यू सीतलं वक्तव्य उपलब्ध आहे, हे पहावं. सत्तेचं वाटप ५०-५० टक्के हा त्यांचा शब्द आहे. त्यांनी विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काय अर्थ आहे…

सहा महिन्यापूर्वी जो ४०-५० आमदारांचा सूरत, गोवाहटी, गोवा हा शपथविधी झाला तो शरद पवार यांच्या सांगण्यातून झाला, असंही म्हणू शकतात. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला. नागपूरात ते हरले. कसबा आणि चिंचवडमध्येही पराभव दिसतोय. म्हणून लोकांना भ्रमित करण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत.

‘आठवणीने फडणवीसांना दचकून जाग येते..’

अजित पवार हे मजबुतीने महाविकास आघाडीचं नेते म्हणून वातावरण निर्माण करत आहेत. महाविकास आघाडीला कुठेही तडे गेलेले नाहीत. शपथविधीच्या आठवणीने फडणवीसांना अजून दचकून जाग येते. त्याची कारणं शोधली पाहिजेत. उपचार घेतले पाहिजे. मिंधे आणि फडणवीस याचे हे परिणाम आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

‘जेलमध्ये टाकण्याची भीती’

महाविकास आघाडीच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्यावरून राऊत म्हणाले, फडणवीस अनेक वर्ष राजकारणात आहेत. विरोधी पक्षनेते पदावरील व्यक्तीला राजकीय आरोपीला तुरुंगात टाकण्याची शिवसेनेची नाही. भाजपची ती असू शकते. हे सूडबुद्धीच्या कारवाया भाजपची आहे. त्यांनी या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे. अशी भीती का वाटावी?

त्यांच्या काळात आमच्या सगळ्यांचे फोन टॅप केले जात होते. हा फार मोठा गुन्हा आहे. संबंधित अधिकाऱ्यांना क्लिन चीट दिली. त्याच्याविरोधातील तपास का थांबवला… यातच ती भीती आहे. तुमचं मन खातंय. चोराच्या मनात चांदणं.. अशी म्हण आहे.मविआ सरकार बरं चालत होतं. मला तुरुंगात टाकण्यात आलं तर माझ्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होईल, अशी त्यांची इच्छा होती, असा नवा आरोप राऊत यांनी केलाय.

‘टेस्ट ट्यूब बेबी मांडीवर..’

शपथविधीचं सरकार बनवण्यासाठी शरद पवार यांचा आशीर्वाद होता, हे बोलण्यात अर्थ नाही. आधी आमचा विश्वासघात का केला, टेस्ट ट्यूब बेबी मांडीवर घेऊन बसला आहात. त्याचं उत्तर द्या… अडीच वर्षाचा वादा पूर्ण केला नाही.. असं काही ठरलं नव्हतं हे बोलण्याची हिंमत करू नका… तुमचंचं वक्तव्य आहे. १ नंबरचे खोटारडे लोकं आहेत, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाकडून?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ईव्हीएम मशीन नाही, दावे करायला. आमची शिवसेना शत प्रतिशत खरी आहे. ठाकरे यांची शिवसेना खरी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता आमच्या खिशात आहे, अशा गमजा कुणी मारत असेल तर ते देशाचा अपमान करत आहेत. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून न्यायाच्या अपेक्षेत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.