PHOTO | जोरदार पुष्पवृष्टी करत संजय राऊतांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत, किरीट सोमैयांविरोधात घोषणाबाजी
संजय राऊत विमानतळावर पोहोचण्याच्या आगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच संजय राऊतांवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.
1 / 6
शिवसेना खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच संजय राऊतांवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.
2 / 6
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले.
3 / 6
बुधवारीच संजय राऊत अनेक आरोप करत किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा मीडियासमोर शिवीगाळ करताना दिसून आले होते. त्यानंतर आज शिवसैनिकांकडून ही स्वागताची तयारी करण्यात आली होती.
4 / 6
ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
5 / 6
यावेळी शिवसैनिकांच्या हातात योद्धे असे फलक संजय राऊत यांच्या फोटोसह दिसून आले. त्यानंतर शिवसेनेची ही रॅली निघाली.
6 / 6
शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर भाजप नेत्यांनी मात्र सडकून टीका केली आहे.