Sanjay Raut Rokhthok : किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, भाजपला इशारा, तर मनसेवर घणाघात; संजय राऊतांचे 5 रोखठोक मुद्दे

खासदार संजय राऊत यांच्याशी टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी रोखठोक संवाद साधला. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर देतानाच, राऊत यांनी राज ठाकरे, किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Sanjay Raut Rokhthok : किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, भाजपला इशारा, तर मनसेवर घणाघात; संजय राऊतांचे 5 रोखठोक मुद्दे
संजय राऊत यांची रोखठोक मुलाखतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:45 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप आणि मनसे असं चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलंय. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेते, मंत्र्यांसह थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतोय. अशावेळी महाविकास आघाडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत हे एकाकी लढाई लढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी रोखठोक संवाद साधला. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर देतानाच, राऊत यांनी राज ठाकरे, किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची राज ठाकरेंच्या मागे फरफट होतेय?

शिवसेनेची फरफट कुठेच होऊ शकत नाही. खास करुन हिंदुत्वाच्या बाबतीत. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत आहोत. पण आमची हिंदुत्वाची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी नक्की कोणत्या प्रकारचं हिंदुत्व स्वीकारलं याबाबत संशोधन करावं लागेल. ते राजकारणापुरतं आहे की भाजपला हवं ते हिंदुत्व आहे हे पाहावं लागेल. शिवसेनेच्या हिंदुत्वात राजकीय फायद्या तोट्याचा विचार बाळासाहेबांनी कधीच केला नव्हता. उलट शिवसेनेनं हिंदुत्वासाठी त्यागच केलाय. हिंदुत्वासाठी आम्ही सर्वस्व त्यागायला तयार आहोत. सत्तेचाही मोह आम्हाला नाही.

आजचं जे हिंदुत्व आहे ते खास करुन महाराष्ट्रातील हिंदू मतांमध्ये फुट पाडायची आणि शिवसेनेला अपशकून करायचा यापलीकडे हे नवीन हिंदुत्व फार झेप घेत आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आमची फरफट व्हायचा प्रश्न नाही. उलट भाजपमागे कुणाची फरफट होतेय किंवा भाजपवाले कुणाला फरफटत घेऊन जात आहेत, हे पाहावं लागेल.

राज ठाकरेंच्या सभांचा धडाक्याबाबत काय?

महाराष्ट्रात सभांवर कुणालाही बंदी नाही. आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. गरज नाही, असं आहे की ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं? विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याची आहे, प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, यावर का बोलायचं?

राज ठाकरेंचा अजेंडा कोण ठरवतो यावरही चर्चा होऊ द्या. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवते. महाराष्ट्रातील सत्तेची घडी आहे त्याचं नेतृत्वत शिवसेना करतेय हे लोकांची पोटदुखी आहे. आम्हाला कुणाला विचारावं लागत नाही की काय करायचं, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावलाय.

विरोधी पक्षाच्या पत्रकावर शिवसेनेची सही का नाही?

शिवसेनेने विरोधी पक्षाच्या पत्रकावर सही का केली नाही याची कारण मिमांसा केली. आमचं आम्ही पाहू, आमची भूमिका आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर सत्तेत आहोत. आम्ही आमची भूमिका आणि हिंदुत्व बाजूला ठेवलेलं नाही. आम्ही दहा मुद्दे काढले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, जातीय सलोखा कायम ठेवणं याच मुद्द्यावर राज्य चालतं. राज्य भोंगे उतरवा आणि भोंगे चढवा यावर चालत नाही. देशाचं राज्याचा विकास करणं हे जसं पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचंही कर्तव्य आहे. देशात किंवा राज्यात अशांतता निर्माण झाली असेल तर लोकांना शांत राहण्याचं आवाहन करणं जसं पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. तसंच ते मुख्यमंत्र्यांचही आहे, असं राऊत म्हणाले.

‘सोमय्यांना जोडेच मारले पाहिजेत’

भाजप नेते किटी सोमय्या यांच्याबाबत संजय राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. त्यावरुन राज ठाकरे यांनीही राऊतांवर निशाणा साधला होता. सोमय्यांबाबत विचारलं असता राऊत म्हणाले की, जो माणूस महाराष्ट्राच्या विरुद्ध दिल्लीत जाऊन कारस्थानं करतो, त्याला जोड्यानंच मारलं पाहिजे. ही परंपराच आहे महाराष्ट्राची. एन्ड आय रिपीट.. आणि मी शब्द मागे घेतले का? मी सॉरी बोललोय का? नाही. मी 35 वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलंय. 30 वर्ष संपादक म्हणून काम केलंय. तुम्ही जर कुणाच्या तरी सुपाऱ्या घेत असाल आणि बदनाम करत असाल, आणि महाराष्ट्राबद्दल प्रेझेंटेशन देत असाल, तर जोडेच मारले पाहिजे या सारख्या माणसांना, असा संताप राऊत यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री, गृहमंत्री आता अॅक्शन मोडमध्ये

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी गृहमंत्रालयाबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे, वळसे पाटील आणि राऊतांमध्ये बैठकही झाली होती. त्याबाबत विचारलं असता, आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत. हैदोस घातलाय. या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहेत. केस किती खोट्या पायावर उभी आहे, ते तुम्हाला कळेल. देशमुखांच्या 6 वर्षांच्या नातीची चौकशी करावी? नवाब मलिकांची 55 लाखांची केस 5 लाखांवर आली, असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Jayant Patil: आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही: जयंत पाटील

ऊस शेतीवर शरद पवारांनी बोलनं हे अत्यंत दुर्दैवी; राजू शेट्टींचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.