देशातली लोकशाही संपली, संजय राऊत यांची राहुल गांधींच्या वक्तव्यावर सहमती, काय म्हणाले?

तालिबान आणि अलकायदासारखे लोक आपल्या विरोधकांना नष्ट करण्यासाठी हातात शस्त्र उचलतात. या सरकारने ईडी आणि सीबीआयसारखे शस्त्र उचलले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

देशातली लोकशाही संपली, संजय राऊत यांची राहुल गांधींच्या वक्तव्यावर सहमती, काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 10:52 AM

मुंबई : देशातली लोकशाही संपली आहे. तिचा मुडदा पडला आहे, असं गंभीर भाष्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतंच लंडन येथील केम्ब्रिज विद्यापीठात भाषण केलं. यावेळी त्यांनी भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची जगभरात चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना आपण त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहोत, असं म्हटलंय. त्यामुळेच तर देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं.

विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे…

संजय राऊत म्हणाले, देशातील सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. काँग्रेस, आप, नॅशनल कॉन्फरन्स असो. अखिलेश यादव, सर्वांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदींना पत्र लिहून कळवलं आहे. सरकारविरुद्ध बोलणं हा गुन्हा ठरतोय. जे बोलतात त्यांच्यावर तपास यंत्रणा, ईडी सीबीआय यांचे हल्ले होत आहेत. देशात सध्या हुकुमशाहीपेक्षाही जास्त भयंकर वातावरण आहे. तालिबान आणि अलकायदासारखे लोक आ पल्या विरोधकांना नष्ट करण्यासाठी हातात शस्त्र उचलतात. या सरकारने ईडी आणि सीबीआयसारखे शस्त्र उचलले आहेत. त्यामुळे लोकशाही फक्त धोक्यातच नाही तर ती संपली आहे. तिचा मुडदा पडला आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलय.

खेडमध्ये शिवसेनेचा महासागर

उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील खेड येथील सभेत मोठी गर्दी उसळली. त्यावरून संजय राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह असून जनतेचा आमच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं. संजय राऊत म्हणाले, ‘ खेडमध्ये गर्दी नव्हती शिवसेनेचा महासागर होता. लाखोंच्या संख्येने इथे लोक होते. कागदावर काहीही निर्णय असला तरी शिवसेना निवडणूक आयोगाच्या बापाची जहागिर नाही.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.