Sanjay Raut: जेलमध्ये शिकलेली भाषा संजय राऊत यांनी बंद करावी- चंद्रशेखर बावनकुळे
गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विरूध्द संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.
नागपूर, संजय राऊत (Sanjay Raut) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यातले वाकयुध्द सध्या तरी संपेल असे चिन्ह दिसत नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला. संजय राऊत यांनी सकाळी उठून टोमणे मारणे बंद करावे, असा सल्ला बावनकुळेंनी राऊतांना दिला. इतकेच नाही तर शंभर दिवस जेलमध्ये राहून ते जी भाषा शिकले तीही बंद करावी असे म्हणत खोचक टोला लगावला. अध्यक्ष निवडणूकीच्या वेळी ज्याप्रमाणे 164 मतांचे बहुमत प्राप्त झाले तो आकडा 184 पर्यंत जाईल अशी भिती संजय राऊत यांना वाटत असावी असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
शिल्लक राहीलेल्यांना खरी परिस्थिती सांगावीच लागेल
संजय राऊतांना शिवसेनेमध्ये शिल्लक राहीलेल्यानां सत्तेबद्दलची खरी परिस्थिती सांगावीच लागेल कारण शिवसेनेतून शिंदे गटात येण्यासाठी रांग लागलेली असते असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या दाैऱ्यामध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत, प्रत्येक स्थरातील कार्यकर्ते शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
त्यामुळे शिल्लक राहीलेल्या आमदार खासदारांना दिलासा देण्यासाठी हे सरकार जाणार आहे असे सांगत असल्याचे बावनकुळे म्हणाले. सकाळी ऊठून टोमणे मारण्यापेक्षा विकसाच्या दृष्टीने सरकारने कोणती कामे करावी याबद्दल सरकारला सुचना द्याव्या असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
संजय राऊत हे जगातल्या काही विद्वानांपैकी एक असून विरोधी पक्ष म्हणून त्यांची भूमीका त्यांनी योग्य प्रकारे निभवावी असा सल्ला बावनकुळेंनी राऊतांना दिला.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे विरूध्द संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाना साधला.