पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, म्हणजे अजित पवारांनी फोडले असा अर्थ नाही : संजय राऊत

मुंबई पोलिसातील बदल्यांचं कुणी राजकारण करु नये, त्यावरुन काही वाद नाही, असं संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन म्हणाले.

पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, म्हणजे अजित पवारांनी फोडले असा अर्थ नाही : संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 2:55 PM

मुंबई : पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ ते अजित पवारांनी फोडले असा होत नाही, ते पूर्णपणे स्थानिक राजकारण आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत सारे काही आलबेल असल्याचा दावा केला. (Sanjay Raut on Shivsena Parner Corporators entering NCP)

मुख्यमंत्र्यांचं सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचं कुणी राजकारण करु नये, त्यावरुन काही वाद नाही, असं संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन म्हणाले.

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असं उत्तर राऊत यांनी दिलं.

हेही वाचा : रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला

महाविकास आघाडीत अंतरविरोध, अंतरपाट नाही, आम्ही वरमाला घातल्या आहेत, महाविकास आघाडी सरकार हे खिचडी नाही, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीत खटके उडत नाहीत, खटका हा शब्द आम्ही नाही, मीडियाने वापरला. महाविकास आघाडीत समन्वय समिती आहे. त्यात तिन्ही पक्षाचे दोन-दोन प्रमुख नेते आहेत, कोरोनामुळे संवाद कमी झाला आहे, मात्र तिन्ही पक्ष एकत्रपणेच चर्चा करुन निर्णय घेतात, थोरातांनीही परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केली, असं राऊत म्हणाले.

कोरोनाचा मुद्दा हटवण्यासाठी आमच्याकडे बोट दाखवत असाल तर चीनचा मुद्दाही उपस्थित केला असं म्हणता येईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

लोकांनी पाहिलेले पवार वेगळे, मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले, मी सरकार बनवताना शरद पवारांची ठाम भूमिका बघितली. शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत शनिवारपासून प्रसिद्ध होईल, ही मुलाखत आतापर्यंतची सर्वात वेगळी असेल, त्यांचं ज्ञानाचं भांडार लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं, आज देशात त्यांच्याइतका ताकदीचा नेता दुसरा नाही, अशी स्तुतिसुमने संजय राऊत यांनी उधळली.

पारनेरमध्ये काय झाले?

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

मुख्यमंत्र्यांचा निरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला.

संबंधित बातम्या :

कोण आहेत पारनेरचे 5 नगरसेवक, ज्यांच्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस?

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप

आधी चर्चा, मग बदल्या; ठाकरे-पवार बैठकीत एकमत, 20 मिनिटात काय काय घडलं?

पारनेरमधील फोडाफोडीनंतर शिवसेनेने ‘करुन दाखवले’, राष्ट्रवादीला कल्याणमध्ये दणका

(Sanjay Raut on Shivsena Parner Corporators entering NCP)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.