मुंबई : आज देहूत मोदी (PM Modi) वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला आले मात्र आता त्याच कार्यक्रमात अजित पवारांना (Ajit Pawar) बोलण्याची संधी न मिळाल्याने नवा वाद पेटला आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा भाषेत काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल चढवला आहे. तर आता यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सडकून टीका केली आहे. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या कार्यक्रमाला त्यांना विशेष निमंत्रित होते. आज त्यांना बोलू दिले नाही म्हणून पंतप्रधानांनी आश्चर्य व्यक्त केलं अशा प्रकारचे चित्र मी पाहिले. मात्र विरोधी पक्ष नेते प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याविषयी आमचा आक्षेप नाही. पण त्यांना असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचेच प्रधानमंत्री आहेत, तसा त्यांचा वावर आहे, पुण्याच्या सुपुत्राला उपमुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री कार्यालयांने बोलू न देना ज्याप्रकारे सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे हा एक अस्वस्थ करणारा विषय आहे, असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल चढवला आहे.
तसेच आता भाजपवाले म्हणतील की यात कसला झाला महाराष्ट्राचा अपमान ? तर तुम्हाला बोलू दिले म्हणून सन्मान नाही, हा एक प्रकारे महाराष्ट्राचा अपमानच आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडवल्या जात आहेत, हे मी प्रकर्षाने सांगू इच्छितो. देहू संस्थांनाने याबाबत काही खुलासे केले आहेत की प्रधानमंत्री कार्यालयांने अजित पवारांना बोलू दिले नाही. तर त्या संदर्भात संस्थानने महाराष्ट्र सरकारला कळवायला हवं होतं. शेवटच्या मिनिटाला प्रधानमंत्री कार्यालयने संस्थानला कळवलं नाही हे आधीच कळवलं होतं. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली जाते, मात्र सरकारचे प्रतिनिधी असलेल्या मा. अजितदादांना बोलायला न दिल्यामुळे सर्व स्तरातून आता भाजप व केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
— NCP (@NCPspeaks) June 14, 2022
पुण्यात अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही हा वाद ताजा असतानाच मुंबईत दुसरा वाद पाहायला मिळाला. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या स्वागताला जात असताना मंत्री आदित्य ठाकरे यांना सुरक्षा यंत्रणाकडून अडवण्यात आले त्यावरून आता संजय राऊत आक्रमक झाले आहेत. ज्या सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरे यांना थांबवलं त्या सुरक्षा यंत्रणा आज चीनच्या बॉर्डरला पाठवायला पाहिजेत. आदित्य ठाकरे या राज्यचे राजशिष्टाचार मंत्री आहेत. मुख्यमंत्री यांचेनंतर अशा प्रकारच्या व्यक्तींकडून पंतप्रधानांचे स्वागत केले जाते, तसेच मुंबईत येऊन तुम्हाला जर ठाकरे माहीत नसतील तर हे अवघड आहे. हे जाणून बुजून केला जात आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.