डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार : संजय राऊत
अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा (Sanjay Raut says on government) प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात एक मजबूत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
नवी दिल्ली: अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा (Sanjay Raut says on government) प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात एक मजबूत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उद्यापर्यंत (21 नोव्हेंबर) सत्तेचं चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी (Sanjay Raut says on government) मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचाही पुनरुच्चार केला.
संजय राऊत म्हणाले, “डिसेंबरच्या आधी राज्यात एक मजबूत सरकार स्थापन होईल. यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. त्यामुळे काही कायदेशीर पेचही आहेत. मात्र, राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा घेऊन जाऊ, तेव्हा ते आम्हाला सत्तास्थापनेचं आमंत्रण देतील. सर्व राज्यांमध्ये हीच पद्धत अवलंबिली जाते.”
प्रत्येक पक्षाची काम करण्याची एक पद्धत असते. शिवसेनेची पद्धत वेगवान आणि गतीमान आहे. आमच्याकडे क्रिया प्रतिक्रिया नसते. आधी बाळासाहेब आदेश द्यायचे आता उद्धव ठाकरे देतात. ते इतर पाळतात. राष्ट्रवादीतही शरद पवार यांचा निर्णय त्यांचा पक्ष पुढे नेतो. काँग्रेसची 100 वर्षांपूर्वीची परंपरा आहे. निर्णय लहान असो की मोठा ते त्याच परंपरेतून निर्णय घेतात. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असाव्यात, असा आमचा अंदाज आहे. आता लवकरच महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या हिताचं शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, सामाजिक न्याय, पायाभूत सुविधा, विकास अशा मुद्द्यावर एक लोकप्रिय सरकार स्थापन होईल.”