Deepali Sayyad : उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्या, दिपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला
ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेणेही महत्वाचे आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे देखील सर्वांच्या समोर येणे गरजेचे आहे. आता सुरवातीपासून या दोन गटांना एकत्र आणण्यासाठी दिपाली सय्यद ह्या पुढाकार घेत आहेत पण अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे यश त्यांना आलेले नाही.
मुंबई : (Shiv Sena) शिवसेनेतील आमदरांनी बंडाची भूमिका घेतल्यापासून ते आतापर्यंत अभिनेत्या तसेच शिवसेनेच्या नेत्या (Deepali Sayyad) दिपाली सय्यद ह्या मध्यस्तीची भूमिका घेत आहे. शिवसेना एक कुटुंब आहे आणि ते कायम एकच रहायला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे. एवढेच नाहीतर प्रत्येकाला एकत्र येऊ वाटतंय पण कोणी आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवत नाही. आज मुलाखतीच्या माध्यमातून (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील सर्वकाही बाहेर आले आहे. अशीच मुलाखत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली तरी कुठेतरी समेट घडून येईल असा आशावाद दिपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. दिवसेंदिवस शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील अंतर वाढत असताना दिपाली सय्यद यांना मात्र, हे दोन गट एकत्र येतील अशी आशा आहे.
एकनाथ शिंदे यांचे म्हणणेही महत्वाचे..
संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेऊन त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट होते. पण ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेणेही महत्वाचे आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे देखील सर्वांच्या समोर येणे गरजेचे आहे. आता सुरवातीपासून या दोन गटांना एकत्र आणण्यासाठी दिपाली सय्यद ह्या पुढाकार घेत आहेत पण अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे यश त्यांना आलेले नाही.
अमित शाह यांची भूमिकाच महत्वाची
यापूर्वी शिवसेना आणि भाजपाची युती घडवून आणण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे योगदान मोठे राहिले आहे. वेळ पडली तर त्यांचीही भेट घेऊन हे दोन गट एकत्र येण्याच्या अनुशंगाने प्रयत्न केले जाणार आहेत. एवढेच नाहीतर सध्या दिपाली सय्यद ह्या दिल्लीमध्ये असून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनीच सांगितले आहे. एवढे फाटले असतानाही ते शिवण करुन वापरता येईल याकरिता ती गोष्ट मनात असणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
आरोप-प्रत्यारोपामुळेच अंतर वाढलं
दिवस उजाडल्यापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मनात एकत्र येण्याची इच्छा असताना केवळ त्यांने टिका केली म्हणून समोरचाही आक्रमक होत आहे. त्यामुळेच हे अंतर वाढत आहे. शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र संपले तर पुन्हा संबंध सुधारतील पण तसे व्हावे ही इच्छा मनातही असणे तेवढेच गरजेचे असल्याचे सय्यद ह्या म्हणाल्या आहेत. शिवाय भविष्यातही शिवसेना एका छताखाली येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.