तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल, तर राख व्हाल" असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 3:39 PM

नवी दिल्ली : “तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा एल्गार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर केला होता. (Sanjay Raut slams Devendra Fadnavis over his roar about BMC election)

“आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे. कोणीही आमच्या भगव्याविषयी बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल, तर राख व्हाल” असा इशारा संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी भाजपला दिला.

“भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा. भगवा फडकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा. आमचं हिंदुत्वसुद्धा आहे. कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वेळ आल्यास आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडू. मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार स्थापन करणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

“विजेमध्ये झालेला तोटा हा भाजपच्या सरकारच्या काळातला आहे. तो त्यांनी वसूल करुन द्यावा. त्यानंतर भाजपने आरोप करावा” असंही राऊतांनी सुनावलं. “महाराष्ट्रामध्ये कोरोना आटोक्यात आहे दिल्लीसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार सजग आहे” अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता. (Sanjay Raut slams Devendra Fadnavis over his roar about BMC election) आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला होता.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारचा माज उतरवणार; मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

राष्ट्रीय मुद्दयावर बोलतोय, देशात कलम 370 लागू होणार नाही म्हणजे नाही : देवेंद्र फडणवीस

(Sanjay Raut slams Devendra Fadnavis over his roar about BMC election)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.