तुमची ती कुटनीती, मग आमचे काय? तुम्ही विदूर, चाणक्याच्या पोटातून जन्माला आलाय का?; संजय राऊत यांचा पलटवार

फडणवीस आणि शिंदे यांनी केलेला विश्वासघात महाराष्ट्राच्या काळजात आरपार घुसला आहे. आम्हाला कुटनीती जमत नाही का? तुम्ही काय चाणक्य आणि विदूराच्या पोटातून जन्म घेतला आहे काय? चाणक्य आणि विदूर तुमचा बाप आहे का? आमचा कोण आहे?

तुमची ती कुटनीती, मग आमचे काय? तुम्ही विदूर, चाणक्याच्या पोटातून जन्माला आलाय का?; संजय राऊत यांचा पलटवार
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 12:53 PM

मुंबई : आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो ही आमची कुटनीती आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीसोबत जाणं याला बेरजेचं राजकारण म्हणतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानांचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीसोबत जाणं तुमची कुटनीती होती, मग आमचं काय होतं? राष्ट्रवादीसोबत जाणं तुमचं बेरजेचं राजकारण होतं. तर आमचं काय होतं? असा सवाल करतानाच तुम्ही विदूर आणि चाणक्याच्या पोटातून जन्माला आलाय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ठाणे जिल्ह्यात दोन हास्य जत्रेचे शो पाहिले. कुठे फू बाई फू. कुठे हवा येऊ द्या. कुठे हास्यजत्रा सुरू होतं. ठाणे जिल्ह्यात बाजूबाजूला काल दोन शो पार पडले. देवेंद्र फडणवीस आणि फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचे हे शो होते. मी हास्यजत्रा किंवा विनोदी कार्यक्रम का म्हणतो? उद्धव ठाकरे पोहरादेवीची शपथ घेऊन खोटे बोलले, असं फडणवीस म्हणाले. खरं तर हा पोहरादेवीचा अपमान आहे. सकाळपासून त्या समाजातील नेत्यांनी सांगितलं, फडणवीस वारंवार आमच्या पोहरादेवीचा अपमान करत आहेत. पोहरादेवीची कोणी खोटी शपथ घेत नाही. ते जागृत देवस्थान आहे. पण ही खोटारडी लोकं पोहरादेवीलाच खोटं पाडत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे सुद्धा वाचा

तुमची कुटनीती, आमचं काय?

फडणवीस म्हणतात, आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो हा अधर्म आहे. अधर्म असला तरी कुटनीती आहे. मग आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो ते काय होतं? तुम्ही जाता ती कुटनीती. विदूर नीती, चाणक्य नीती मग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली, हे काय होतं? याचं उत्तर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवं. वैफल्यग्रस्त असल्याने चुकीची विधाने करू नका. तुमचं हसं होतं. तुमची ती कुटनीती मग आमचं काय? आमची कोणती नीती? असा सवाल राऊत यांनी केला.

त्याच बेरजेच्या राजकारणात तुम्ही सत्ता भोगली

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आले ही सुद्धा या राज्याची गरज आणि कुटनीतीच होती. तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. ठाण्यातील दुसऱ्या फू बाई फूच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणाले, राष्ट्रवादीसोबत गेलो ते बेरजेचं राजकारण आहे. हे बेरजेचं आहे की खरजेचं आहे हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. मग शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेली ते कोणतं राजकारण होतं? त्या बेरजेच्या राजकारणात तुम्ही सत्ता भोगली, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

अजित पवारांना कंठ फुटायचाय

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण किती खोटारडे आहोत हे दाखवून दिलं आहे. काल काय बोललो, आज काय बोललो याचं भान नाही. कोणत्या नशेत आहेत हे? यांना कोणती भांग कोणी पाजली हेच कळत नाही. लोकमान्य टिळक म्हणायचे एक आण्याची भांग प्यायल्यावर खूप कल्पना सूचतात. तसेच हे कोणती भांग प्यायले माहीत नाही. फडणवीस, शिंदे मिंधे खोटं बोलत आहेत. अजित पवारांना अजून कंठ फुटायचा आहे. त्यावर बोलूच. पण मला त्यात पडायचं नाही, असंही ते म्हणाले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.