Sanjay Raut on BJP: चिकनच्या रांगेत दिसला तरी भाजपवाले ईडीला कळवतील; संजय राऊतांनी डिवचले
कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (kolhapur north bypoll) मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत.
नवी दिल्ली: कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (kolhapur north bypoll) मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भोंगे लावण्याचं चंद्रकांत पाटलांना कळलं. भाजप आपल्या खर्चानं करताहेत. आता तिथेही ईडी लावतील. जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या मागे लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जपून पैसे खर्च करा. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेला तरी, तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे. तुम्ही चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं? किती घेतलं? आज किती घेतलं? यावर भाजपचं लक्ष आहे. ते ईडीला कळवतील. त्यामुळे सावध राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भोंगे आणि ईडीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं. देशात अनेक राज्यात भोंगे उतरलेले नाहीत. भाजपशासित राज्य मोठ्या प्रमाणात भोंगे आहेत. मधल्या काळात गोव्यात होतो. अनेकदा अजान ऐकत होतो. गोव्यात दहा वर्षापासून भाजपचं राज्य आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी गेलो. उत्तर प्रदेशातील भोंगे आहे तसेच आहेत. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन होणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार राज्याचा अधिकार
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारावर थेट भाष्य करणं राऊत यांनी यावेळी टाळलं. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा खांदेपालट करायचा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. तीन पक्ष निर्णय घेतील. मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही. काँग्रेसचे आमदार आले. ते केसी वेणूगोपाल यांना भेटले. त्यांची काही मते मांडली. शिवसेना सोडली तर सर्वांचे हायकमांड हे दिल्लीत आहेत. त्यांना यावं लागतं. वेणूगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व पक्षीय खासदारांना डिनर
राज्यातील सर्व पक्षीय खासदार दिल्लीत आले आहेत. त्यांच्यासाठी संध्याकाळी माझ्याकडे चहापान आहे. नंतर शरद पवार यांच्याकडे जेवण आहे. आम्ही यजमान आहोत. राजकीय वातावरण खेळीमेळीत राहावं. विचारांच आदानप्रदान व्हावं, मी सगळ्या आमदारांना बोलावलं आहे. आमच्याकडे फाळणी होत नाही, जातीय धार्मिक फाळणी विरोधात आम्ही आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : नवी दिल्ली शिवसेना खासदारांच्या बैठकीत नाराजी