Sanjay Raut : मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून का होईना? असा सवाल विरोधकांकडून रोज विचारण्यात येतोय, तर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घटनेचा दाखला देत थेट राज्यपालांना सवाल केलाय.

Sanjay Raut : मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:59 PM

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं मोठं बंड झालं, ठाकरे सरकार कोसळलं आणि गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोघांच्या रूपानं राज्याला नवं सरकार मिळालं. मग दोन दिवसांचं अधिवेशन घेत तातडीने विधानसभा अध्यक्षांची निवडही केली, विधानसभा अध्यक्षपदीर राहुल नार्वेकर विराजमान झाले. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने आपला बहुमतही सिद्ध केलं. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झाला नाही. 160 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन असणाऱ्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून का होईना? असा सवाल विरोधकांकडून रोज विचारण्यात येतोय, तर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घटनेचा दाखला देत थेट राज्यपालांना सवाल केलाय.

थेट राज्यपलांना सवाल

हे सरकार बेकायदेशीररित्या आल्याचा आरोप तर संजय राऊत वारंवार करत आहेत. मात्र आता संजय राऊत यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये ते लिहितात, “भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही राज्यपाल, हे काय सुरू आहे ?” असे ट्विट राऊतांकडून करण्यात आलंय. त्यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे आणि फडणवीसांवरती दबाही वाढताना दिसत आहे.

संजय राऊतांचं ट्विट

हरी नरके यांनीही हाच दाखला दिला

प्राध्यापक हरी नरके यांनी याच कलमाचा दाखला देत नियमावर ती बोट ठेवलं आहे आणि दोन मंत्र्याच्या कॅबिनेटवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा विरोधात आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. तसेच हे प्रकरण कोर्टात गेल्यास फडणवीस आणि शिंदेंना अडचणीत आणणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. तर कॅबिनेटचा विस्तार हा लवकरच होईल, माझं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता तरी तातडीने विस्तार होणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.