Sanjay Raut on Eknath Shinde : ‘कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे..’ झिरवळांचा फोटो ट्वीट करत राऊतांनी चुचकारलं!

Eknath Shinde News : एकीकडे संजय राऊतांनी ट्वीट केलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट आणि फेसबुक पोस्ट करत शिवसैनिकांना शनिवारी रात्री आवाहन केलंय.

Sanjay Raut on Eknath Shinde : 'कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे..' झिरवळांचा फोटो ट्वीट करत राऊतांनी चुचकारलं!
राऊतांचं ट्वीट...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 7:58 AM

मुंबई : शिवसेना (Shiv sena politics) खासदार यांनी ट्वीट करत संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना (Rebel Shiv sea MLA)चुचकारलंय. ‘कब तक छीपोगे गोहातीमे.. आना हि पडेगा.. चौपाटीमे.., असं म्हणत त्यांनी बंडखोरांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलंय. लपून बसलेल्या शिवसेना आमदारांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी ट्वीट करताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एक खास शैलीतला फोटोही राऊतांनी पोस्ट केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटाने विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वाव ठरावाचं पत्र दिलं होतं. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे गटासाठी धक्का मानला जातोय. आताच्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रात सत्तेचा आणि सत्तेसाठीच्या समीकरणाचा पेच नाजूक वळणावर आहे. अशात विधानसभा अध्यक्ष नसताना उपाध्यक्षांकडेच विधानसभा अध्यक्षांचे सगळे अधिकार असतात. तर दुसरीकडे राज्यपालांची भूमिकाही महत्त्वाची असते. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पाहा ट्वीट :

एकीकडे संजय राऊतांनी ट्वीट केलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट आणि फेसबुक पोस्ट करत शिवसैनिकांना शनिवारी रात्री आवाहन केलंय. राज्यभरात एकनाथ शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे समर्थक असा संघर्ष सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं होतं.

पाहा काय म्हणाले शिंदे?

आता महाराष्ट्रात सत्तासंघर्ष पुन्हा पेटला आहे. एकीकडे बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांची राजकीय भूमिका नेमकी काय ठरते? त्यावरुन राजकीय समीकरणं बदलणार आहे. स्वतंत्र गट स्थापण्यापासून ते भाजपला पाठिंबा देण्यापर्यंत, अनेक बाबींवर आता राज्याच्या जनतेचं लक्ष लागलंय. पण गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांना कधी ना कधी मुंबईत हे यावंच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना सातत्यानं मुंबईत येण्याचं आव्हान आता शिवसेनेच्या नेत्यांकडून केलं जातंय.

वाचा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.