ही सरळ धमकी समजायची का? ‘जेल’ च्या वक्तव्यावरून संजय राऊत यांचा सवाल

संजय राऊत यांनी तोंड आवरावं. साडे तीन महिले आराम करून आल्यामुळे त्यांना बाहेरचं वातावरण सूट होत नाहीये, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं होतं.

ही सरळ धमकी समजायची का? 'जेल' च्या वक्तव्यावरून संजय राऊत यांचा सवाल
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 3:34 PM

मुंबईः महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border issue) सत्य बोलणारे, प्रश्न विचारणाऱ्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा… ही सरळ सरळ धमकी समजायची का, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातवरण तापलं आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नावर मूग गिळून बसले आहे. ते षंढ, नामर्द आहे, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर राऊत यांनी ट्विटरद्वारे हा सवाल केलाय.

संजय राऊतांचं ट्विट काय?

संजय राऊत यांनी तोंड आवरावं. साडे तीन महिले आराम करून आल्यामुळे त्यांना बाहेरचं वातावरण सूट होत नाहीये, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय, – मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत.सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ… असंही राऊत यांनी लिहिलंय.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

वारंवार सरकारवर टीका करणाऱ्या राऊत यांनी जेलमध्येच ही भाषा शिकली. षंढ, मर्दानगी हे शब्द तिथूनच शिकून आल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलं. त्यांना संजय राऊत यांनी ट्विटरमधूनच उत्तर दिलं.

मी तयार आहे -संजय राऊत

संजय राऊत यांनी लिहिलंय- शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा.न्यायालये.तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे.!!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.