ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश, संजय राऊत यांचं मुनगंटीवारांना उत्तर

शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाही, जो शब्द दिलाय तो पाळा, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी भाजपला दिला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत (Sanjay Raut warns BJP)  यांनी हा इशारा दिला.

ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश, संजय राऊत यांचं मुनगंटीवारांना उत्तर
Follow us
| Updated on: Oct 31, 2019 | 10:42 AM

मुंबई : शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाही, जो शब्द दिलाय तो पाळा, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी भाजपला दिला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत (Sanjay Raut warns BJP)  यांनी हा इशारा दिला. शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही. राजकारणात सगळ्यांना पर्याय खुले आहेत.शिवसेना लहान मुलांचा पक्ष नाही. समसमान वाटप याचा अर्थ काय? त्यात मुख्यमंत्री पद येत नाही का? भाजप नेते जर पर्याय आहे म्हणत असतील, तर सेनेकडे पर्याय नाही का? आता प्रस्ताव नाही तर थेट चर्चा व्हावी, भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सत्तेचा दावा करावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

याशिवाय संजय राऊत यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांच्यावर टीका केली. विनाशकाले विपरीत बुध्दी आमची नाही तर तुमची आहे. ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश, असं संजय राऊत म्हणाले.

यापूर्वी मुनगंटीवार यांनी शिवसेना भाजपसोबतच राहील. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, तसं केल्यास ती शिवसेनेची विनाशकाले विपरीत बुध्दी ठरेल, असं म्हटलं होतं. त्याला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

शिवसेनेचं संख्याबळ 63 वर

शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे. जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा (Chandrakant Patil Backs Shivsena) जाहीर केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचं संख्याबळ अपक्षांच्या जोरावर 63 वर पोहोचलं आहे. आतापर्यंत 7 अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या 

चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा 

शिवसेनेचे 18, भाजपचे 24, फडणवीसांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी व्हायरल 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.