Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : वेळ आली तर सभागृहातही बहुमत सिद्ध करु, शरद पवार-काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांची घोषणा

वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा संजय राऊत यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहतील असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.

Sanjay Raut : वेळ आली तर सभागृहातही बहुमत सिद्ध करु, शरद पवार-काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांची घोषणा
संजय राऊत, खासदार, शिवसेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:05 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका मांडल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलंय. वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहतील असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केलीय.

संजय राऊत म्हणाले की, मी सकाळपासून वर्षा बंगल्यावर आहे. शरद पवारांपासून सर्व नेते याठिकाणी आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरुन मातोश्रीवर जात आहे. आम्हाला सत्तेचा मोह नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. पुन्हा सत्याचा विजय होईल. सर्व नेत्यांनी येऊन सद्धावना व्यक्त केल्या, आम्ही त्यांचे आभारी आहोत. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हेच कायम राहतील. वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा राऊतांनी केलाय.

उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन काय?

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी  मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे चार मागण्या

आता एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या  माध्यमातून चार मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलंय.

एकनाथ शिंदेंच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.