संजय राऊत यांचं काय होणार? आतच राहणार की बाहेर येणार?; आज महत्त्वाची सुनावणी
खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज काही वेळात सुनावणी होणार आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्या (patra chawl scam) प्रकरणी संजय राऊत ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. या प्रकरणी त्यांना जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून राऊत यांना दिलासा मिळेल की पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज काही वेळात सुनावणी होणार आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहे. या प्रकरणी त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राऊत यांचे अॅड. अशोक मुंदरंगी यांचा या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
मुंदरंगी यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या वतीने अॅड. अनिल सिंह हे आज युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे सिंह कोणते मुद्दे मांडतात आणि मुंदरंगी यांचे मुद्दे कसे खोडून काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधू नये किंवा कार्यकर्त्यांकडे काही प्रतिक्रिया देऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. राऊत हे मीडियासमोर जाऊ नये म्हणून त्यांच्या आवतीभोवती पोलिसांचा गराडा ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची ईडीने चौकशी केली होती. राऊत यांच्या घरी रेडही पडली होती. त्यानंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यावर चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटकेत घेण्यात आलं होतं.