Sanjay Raut: संजय राऊतांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या भावाची धावाधाव; मातोश्रीवरुन थेट दिल्ली गाठली
संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत(Sunil Raut) हे धावाधाव करत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांची मातोश्री येथे भेट घेतल्यानंतर सुनील राऊत यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) हे सध्या अर्थ रोड कारागृहात आहेत. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत(Sunil Raut) हे धावाधाव करत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांची मातोश्री येथे भेट घेतल्यानंतर सुनील राऊत यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे. संजय राऊत प्रकरणाबाबत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.
संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. त्यांनी जामीनासाठी देखील अर्ज केला आहे. ईडीला त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे याबाबत कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भातच वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.
दरम्यान सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला भेटालया बोलावले होते. त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली असं सुनील राऊत यांनी सांगीतले.
सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल असा विश्वास सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. त्यानंतर आता ते दिल्लीत पोहचले आहेत.
31 जुलै 2022 रोजी ईडीने संजय राऊत यांच्या विक्रोळी येथील निवास्थानी धाड टाकली. विक्रोळी येथील निवास स्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी. यानंतर ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ संजय राऊत यांची चौकशी झाली. तब्बल 15 तांसाहून अधिक काळ ईडीकडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. यानंतर अखेरीस 1 ऑगस्ट रोजी साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केली.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा
संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना या घोटाळा प्रकरणात ईडीनं अटक केलीय. आणि सध्या ते कोठडीतच आहेत. राऊतांच्या मागे पत्राचाळ प्रकरण आणि 55 लाखांच्या व्यवहारामुळं ईडी लागलीय, गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. . मात्र जमिनी गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं. पत्राचाळ प्रोजेक्ट संदर्भात 13 मार्च 2018ला म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याकडून तक्रार करण्यात आली.