सूरतला काय काळी जादू आहे, हे पाहायला हवे.. तिथे कुणासमोर जाऊन गुडघे टेकावे लागतायेत.. उदय सामंत यांच्या जाण्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?

सुरतला काय जादुटोणा आहे हे पाहवं लागले. सुरताला कुणापुढे गुडगे टेकवावे लागता. कुणापुढे नाक टेकावे लागते. इथून फाटकी नोट घेऊन जावी लागते. एवढी गुलामी महाराष्ट्रातील आमदारांनी गेल्या साठ वर्षात मी पाहिलं नव्हतं. जे सुरत शिवाजी महाराजांनी लुटली तिथे जाऊन गुडघे टेकतात यांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.

सूरतला काय काळी जादू आहे, हे पाहायला हवे.. तिथे कुणासमोर जाऊन गुडघे टेकावे लागतायेत.. उदय सामंत यांच्या जाण्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 7:20 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या(Eknath shinde) बंडखोरी प्रकरण धक्कादायक वळणावर पोहचले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरु आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद(Sharad Pawar) पवार हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. गुवाहाटीत जाऊन बरेच दिवस झाले, माहित नाही तिथे असं काय आहे की आमदार तिकडं जातायेत? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. तर गुवाहाटीत जायला थेच विमान आहे. मग सुरत मार्गे का जाता? असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते संजय(Sanjay Raut) राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्र ते गुवाहाटी व्हाया सुरत

एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. यांनतर त्यांच्या विमानाने गुवाहाटीमध्ये थांबा घेतला. यानंतर गुवाहाटीतून आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक आमदार गुवाहाटीतील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहे. आमदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे सातत्याने शक्ती प्रदर्शन करत आहेत.

संजय राऊत यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. सूरतला काय काळी जादू आहे हे पाहायला हवे. तिथे कुणासमोर जाऊन गुडघे टेकावे लागतायेत असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

चाळीस लोक गुवाहाटीत बसले आहेत. मजा करत आहेत. मात्र ते जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे. त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होणार. भाजपवाले हे सर्व प्रकरण वादग्रस्त बनवत आहे.  कांजुरमार्गमध्ये सुनिल राऊतांची सभा सुरू आहे. जाऊन बघा. मी आणि माझा परिवार मरेन पण पक्षाशी गद्दारी करणार नाही असे म्हणत राऊतांनी सुनिल राऊत एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे विधान खडून काढले आहे.

सुरतला काय जादुटोणा आहे हे पाहवं लागले. सुरताला कुणापुढे गुडघे टेकवावे लागता. कुणापुढे नाक टेकावे लागते. इथून फाटकी नोट घेऊन जावी लागते. एवढी गुलामी महाराष्ट्रातील आमदारांनी गेल्या साठ वर्षात मी पाहिलं नव्हतं. जे सुरत शिवाजी महाराजांनी लुटली तिथे जाऊन गुडघे टेकतात यांना लाज वाटली पाहिजे.

यांच्यावर लवकर कारवाई होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. आम्ही पाऊलं काळजीपूर्वक टाकत आहोत. अरविंद सावंत आणि कायद्याची टीम यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्यातलं कुणीही सुटणार नाही असंही राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे गटाचे दीपक केसरकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

शरद पवारांनी आधी तर चार वेळी फूट पाडली आहे. आता त्यांना पूर्णच सेना संपायची होती.  शिवसेनेच्या उरलेल्या चौदा आमदारांना राष्ट्रवादीत विलीन व्हावं लागेल. राष्ट्रवादी त्यांना जवळची वाटत असेल तर त्यात विलीन व्हावं असं केसरकर म्हणाले.  सोळा लोक हे 55 लोकांचा निर्णय घेऊ शकत नाही. उरलेल्या लोकांनी काय करायचं तो निर्णय घ्यावा. 51 आमदार आमच्याकडे आहेत. आज आम्ही जे केलंय ते पक्षाच्या हितासाठी केलं आहे. राऊत हे लोकांना भडकवत असल्याचा आरोपही केसरकर यांनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.