Sanjay Raut : गुलाबरावांचा जुलाबराव होईल, 50 खोकी पचणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून उभारला गेलेला आहे. अगदी सामान्यातील सामान्यांना देखील या पक्षामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण काहींना याचा विसर पडला. सर्वसामान्य जनता मात्र आजही पक्षाच्या पाठीशी ठाम आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. आज प्रतिकूल परस्थिती आहे पण अशी भूमिका घेणाऱ्यांना शिवसैनिकांची हाय लागणार असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे.
नाशिक : (Shivsena) शिवसेनेतील आमदारांनी बंड करुन आता भाजपाबरोबर सत्ता स्थापनही केली. असे असताना आमदारांकडून (Rebel MLA) बंडाच्या निर्णयाबाबत वेगवेगळी कारणेही सांगितली गेली. मात्र, जनतेचा विकास आणि मतदार संघात विकास कामासाठी निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे हे वेगळेच असल्याचा घणाघात खा. संजय राऊत यांनी केला आहे. (Gulabrao Patil) गुलाबराव पाटलांचा तर जुलाबराव असे म्हणत त्यांना ते देण्यात आलेले 50 खोके कधीच पचणार नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेने सर्वसान्यांना संधी देऊन नेतृत्व उभा केले त्याचाच विसर जर यांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नसल्याचे राऊतांनी सांगितले.नाशिक येथे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दाखल झालेल्या राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर टीका केली.
बंडाचे खरे कारण गुलदस्त्यामध्येच
बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणे दिली आहेत. पण खरं कारण त्यांच्याकडून लपवलं जात आहे. त्यांना निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. आता हे बंडखोर आमदार संजय राऊताला आणि शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरत असले तरी यामागची कारणे वेगळी आहेत. ती आणखीन यांनी समोर आणलेलीच नाही असे सांगत हे सर्व पैशासाठी केल्याचा आरोपीही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे. आता तरी त्यांनी खरं कारण सांगावे असे खुले आव्हानच त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून केले आहे.
शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही
बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून उभारला गेलेला आहे. अगदी सामान्यातील सामान्यांना देखील या पक्षामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण काहींना याचा विसर पडला. सर्वसामान्य जनता मात्र आजही पक्षाच्या पाठीशी ठाम आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. आज प्रतिकूल परस्थिती आहे पण अशी भूमिका घेणाऱ्यांना शिवसैनिकांची हाय लागणार असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे. त्यामुळे बंडखोरांच्या भूमिकेवर आजही संजय राऊतांकडून टीकास्त्र हे सुरुच आहे. एकीकडे संजय राऊतांमुळेच ही वेळ आल्याचे बंडखोर आमदार सांगत आहेत तर दुसरीकडे राऊतांची फटकेबाजी ही सुरुच आहे.
शिवसेना नव्हे तर आमदार फुटले
शिवसेना ही एक संघटना आहे आणि ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून तयार झालेली आहे. त्यामुळे शिवसेना ही फूटूच शकत नाही. आमदार फुटले म्हणजे शिवसेनेवर त्याचा काही परिणाम होणार नसल्याचेही राऊतांनी सांगितले. शिवसेना ही सर्वसामान्य जनतेच्या आधावर चालणारा पक्ष आहे त्यामुळे आशा आमदारांमुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाहीतर पक्षही आपला आणि धनुष्यबाणही आपला अशी घोषणा यावेळी राऊतांनी केली आहे.