Sanjay Raut : संजय राऊतांच्या कोठडीत वाढ, 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

संजय राऊत अटकेत असताना ते कशी काय धमकी देऊ शकतात असा सवाल कोर्टाने स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांना केला आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या कोठडीत वाढ, 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी
संजय राऊतांच्या कोठडीत वाढ, 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडीImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 2:10 PM

मुंबई – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) कोठडी आज संपली आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीच्या विशेष न्यायालयात हजर होते. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात ईडीने रविवारी रात्री राऊत यांना अटक केली होती. आज संजय राऊत यांना न्यायालयाने चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुढचे चार दिवस ईडीच्या कोठ़डीत राहावे लागणार आहे. ज्यावेळी सुरुवातीला ईडीने ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. पण त्यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसाची ईडीची कोठडी दिली होती.

स्वप्ना पाटकरांच्या वकिलांचा युक्तिवाद

स्वप्ना पाटकरांच्या यांच्या वकीलांनी ज्यावेळी युक्तीवाद वादाला सुरुवात केली. त्यावेळी स्वप्ना पाटकर गोरेगाव पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. संजय राऊत माझ्या क्लाईन्टला धमकावत होते असल्याचे वकीलांनी कोर्टात सांगितले आहेत. संजय राऊत अटकेत असताना ते कशी काय धमकी देऊ शकतात असा सवाल कोर्टाने स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांना केला आहे.

ईडीचा न्यायालयातील दावा

ईडीने संजय राऊतला ताब्यात घेण्याची मागणी करताना दावा केला आहे की राऊत आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईतील चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील कथित अनियमिततेतून गुन्ह्यातून एक कोटी रुपये मिळाले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील अनियमितता आणि आर्थिक मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी आणि त्यांच्या कथित साथीदारांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी मात्र आपल्यावरील आरोप अस्पष्ट असून ते राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून लावण्यात आल्याचा दावा केला.

दिल्लीतील नेते सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याची टीका

जेव्हापासून संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून महाराष्ट्रातील सध्याचे विरोधक दिल्लीतील नेते सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याची टीका करीत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर अजून काही जणांना अटक होणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी काही राजकीय नेत्यांना अटक होणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.