Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली आहे. भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून सेलिब्रेशन केले. या सर्व घटना क्रमावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो असं म्हणत पुन्हा एकदा बंडोखोरांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:57 PM

मुंबई : अखेर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा(resignation as Chief Minister) दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली आहे. भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून सेलिब्रेशन केले. या सर्व घटना क्रमावर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो असं म्हणत पुन्हा एकदा बंडोखोरांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले

मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!

“न्यायदेवता का सन्मान होगा! फायर टेस्ट.. अग्निपरीक्षा की घडी है..ये दिन भी निकल जाएंगे..जय महाराष्ट्र!”

आणखी एक फोटो संजय राऊतांनी ट्विट केला आहे. यात एक संदेश देखील त्यांनी दिला आहे. “न्यायदेवता का सन्मान होगा! फायर टेस्ट.. अग्निपरीक्षा की घडी है..ये दिन भी निकल जाएंगे..जय महाराष्ट्र!” असा संदेश या ट्वीटसोबत संजय राऊतांनी लिहिला आहे. दरम्यान, या ट्वीटसोबतच संजय राऊतांनी अजून एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त केली. पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.