Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा ‘सामना’चा संपादक असणं माझ्यासाठी महत्वाचं- संजय राऊत

मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे. कुमार केतकर हे बाहेर भूमिका मांडूनच राज्यसभेत गेले. पण ते तिकडे गेल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका मांडताना ते दिसत नाहीत. त्यामुळे भूमिका मांडत राहील पाहिजे, जी आम्ही मांडतो, असा सल्लाही राऊतांनी केतकरांना दिलाय.

केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा 'सामना'चा संपादक असणं माझ्यासाठी महत्वाचं- संजय राऊत
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 1:17 PM

पुणे : ‘राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलंय. ते आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली. (ShivSena MP Sanjay Raut’s Lecture on the transition in the media in Pune)

भाषिक वृत्तपत्र देशाचा राज्याचा आधार आहेत. राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं अस वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाच होतं. मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे. कुमार केतकर हे बाहेर भूमिका मांडूनच राज्यसभेत गेले. पण ते तिकडे गेल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका मांडताना ते दिसत नाहीत. त्यामुळे भूमिका मांडत राहील पाहिजे, जी आम्ही मांडतो, असा सल्लाही राऊतांनी केतकरांना दिलाय.

‘पत्रकारांनी राजकीय पक्षाचे अंकित होता कामा नये’

पत्रकारांनी राजकीय पक्षाचे अंकित होता कामा नये. पत्रकारितेत काही पथ्य पाळली पाहिजेत. देशात जे परिवर्तन झालं ते वृत्तपत्रांनी केलं यावर मी ठाम आहे. आता अनेक आव्हानं आहेत. चौथा स्तंभ म्हणता पण त्यांना संसदेत येण्यास नाकारलं जात आहे. यावर कुणी आवाज उठवताना दिसत नाही. यावर पत्रकारांमध्ये एकजूट हवी. भविष्यात असे काही दिसते की राज्यकर्ते माध्यमांना आपल्यासारखं वागवतील आणि ते वाईट आहेत, असंही राऊत म्हणाले.

‘..मग सामान्य माणसांनी बातम्या का पाहायच्या?’

इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये 72 तासात कुठल्याही क्षणी आर्यन खान बाहेर येईल अशी बातमी चालवली गेली. यात काहीही दाखवलं जातं. ते कधीही पाहिलेलं नसतं. शेतकरी, महागाई असे अनेक विषय आहेत. पण आर्यन खानची बातमी आल्यानंतर इतर बातम्या निघून जातात. मग सामान्य माणसांनी का बातम्या बघायच्या किंवा वाचायच्या? असा सवालही राऊत यांनी माध्यमांना केलाय.

‘आजची पिढी लिहायला, कागदाला पेन लावायला विसरली’

कुठल्याही सरकारला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते नको आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाकाळात मृतदेहांचे फोटो एका वृत्तपत्राने दाखवले. तेव्हा त्याच्यावर आठ दिवसांत धाडी टाकण्यात आल्या. मग त्यावेळी त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलं? देशातील मीडिया उद्योजकांच्या हाती जातेय. मात्र, वृत्तपत्रांशिवाय सरकार आणि सरकारशिवाय वृत्तपत्र शक्य नाही. आजची पिढी लिहायला, कागदाला पेन लावायला विसरली आहे. हेच मोठं आव्हान असणार आहे, अशी खंत व्यक्त करतानाच मीडियाला माझ्यामुळे काम मिळतंय. समाजात आणि देशात क्रांती घडवून आणण्याची ताकद वृत्तपत्रात असल्याचा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केलाय.

इतर बातम्या :

‘दोन-अडीच वर्षे मी ही आर्थर रोड कारागृहात, जे लोक स्वागतासाठी तेच नंतर लक्ष ठेवण्यासाठी’, भुजबळांची सांगितला जेलवारीचा अनुभव

आटपाडी डेपोला कुलुप, आंदोलन सुरुच राहणार, ठाकरे सरकारला इशारा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक

ShivSena MP Sanjay Raut’s Lecture on the transition in the media in Pune

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.